News Arena India Survey : भुजबळ, झिरवळांचे गड मजबूत, कांदेंना धक्का; नाशकात राष्ट्रवादी भाजपला वरचढ?
News India Arena Survey : नाशिक शहर व जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप (BJP) पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा केला आहे. याआधीही काही संस्थांनी निवडणुकीचे सर्व्हे जाहीर केले आहेत. आता द न्यूज एरिनाचा सर्व्हे (News Arena India Survey) समोर आला आहे. या संस्थेने नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेत दिग्गज नेतेमंडळी त्यांचे गड शाबूत राखताना दिसत आहेत.
News Area India Survey Pune : दत्तात्रय भरणे, शिरोळे, टिंगरे आणि कांबळे यांच्यासाठी धोक्याची घंटा
भुजबळ गड राखणार, सुहास कांदेंना धक्का
या सर्व्हेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आ. छगन भुजबळ येवला मतदारसंघातून पुन्हा बाजी मारतील अशी परिस्थिती आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांचा पराभव केला होता. आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात आगामी निवडणुकीत उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जाताना दिसत आहे.
आमदार सुहास कांदे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांचा पराभव करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनाच धक्का दिला होता. आता मात्र राजकीय वातावरण फिरले असून या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल असा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे.
North Maharashtra/ Khandesh (47 seats)
BJP : 23
SS : 3
SSUBT : 0
INC : 6
NCP : 14
OTH : 1Nandurbar -BJP : 2, INC : 2
1. Akkalkuwa (ST) : INC
2. Shahada (ST) : BJP
3. Nandurbar (ST) : BJP
4. Navapur (ST) : INCDhule – BJP : 5
5. Sakri : BJP
6. Dhule Rural : BJP
7. Dhule…— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
दिंडोरी मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल असा सर्व्हेचा अंदाज आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचा हा मतदारसंघ आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघात शिवसेनेचे भास्कर गावित यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीतही हा राष्ट्रवादीचा गड अभेद्य राहणार असल्याचा अंदाज आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अपूर्व हिरे यांनी जोरदार टक्कर दिली होती. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आगामी 2024 च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला 5, राष्ट्रवादी काँग्रेस 6, काँग्रेस 2, शिवसेना 1 आणि अन्य पक्षाला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे.पण प्रत्यक्षात हा सर्व्हे सत्यात उतरेल का? यासाठी अद्याप सव्वा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय निकाल लागेल यासाठी 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज आहे.
Nandgaon : NCP
Malegaon Central : INC
Malegaon Outer : SS
Balgan (ST) : BJP
Kalvan : LEFT
Chandvad : BJP
Yewla : NCP
Sinnar : NCP
Niphad : NCP
Dindori (ST) : NCP
Nashik East : BJP
Nashik Central : BJP
Nashik West : BJP
Deolali (SC) : NCP
Igatpuri (ST) : INC