News Arena India Survey : जळगाव भाजपचच! पण, एकनाथ खडसेंसाठीही गुडन्यूज

News Arena India Survey : जळगाव भाजपचच! पण, एकनाथ खडसेंसाठीही गुडन्यूज

News Arena India Survey : जळगाव शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे जाहीर केला आहे.

या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजप (BJP) पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा केला आहे. याआधीही काही संस्थांनी निवडणुकीचे सर्व्हे जाहीर केले आहेत. आता द न्यूज एरिनाचा सर्व्हे समोर आला आहे. या संस्थेने जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेत भाजप जळगाव (Jalgaon) हा आपला बालेकिल्ला पुन्हा सर करताना दिसत आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

खडसे, महाजन, पाटलांचे गड अभेद्यच

या सर्व्हेनुसार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा खडसे यांचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. 2024 च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आ. एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांचे तिकीट निश्चित आहे. तर दुसरीकडे आ. चंद्रकांत पाटील भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे कदाचित तेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घडामोडी जरी घडल्या तरी यंदा ही जागा राष्ट्रवादीकडेच जाताना दिसत आहे.

जामनेर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील निवडणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे संजय गरुड यांचा पराभव केला होता. आताही ही जागा भाजपच्याच खात्यात जाणार असल्याचा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांचे वजन आहे. मागील निवडणुकीत ते विजयी झाले होते. आगामी निवडणुकीतही ही जागा शिवसेनेकडेच राहिल असे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी भाजपला 6, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Chopda (ST) : NCP
Raver : BJP
Busawal (SC) : BJP
Jalgaon City : BJP
Jalgaon Rural : SS
Amalner : BJP
Erandol : SS
Chalisgaon : BJP
Pachora : NCP
Jamner : BJP
Muktainagar : NCP

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube