Sangli Loksabha : ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेतला; विश्वजित कदमांचा आरोप
Vishwajeet Kadam : सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेबाबत उद्धव ठाकरे गटाने (Udhav Thackeray Group) एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून उमेदवाराची घोषणा केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन रणकंदन अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असतानाही उद्धव ठाकरे यांनी थेट उमदेवार घोषित केला आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये नाराजी पसरली असून पुर्नविचार करण्याची मागणी विश्वजित कदमांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला सज्जड दम
सांगलीत लढण्यास आम्ही सक्षम…
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्ष निवडणूक लढवत आहेत. जागावाटपाबाबत तीनही पक्षांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा सुरू असताना सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेत्यांना आम्ही या मतदारसंघाबाबत विनंती केली होती. सांगलीतून लढण्यास आम्ही सक्षम असल्याचं विश्वजित कदम म्हणाले आहेत.
सांगली काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचे असा सर्वांनी निर्णय घेतला होता. शिवाय माझ्यारुपाने एकच उमेदवार द्यायचा असेही ठरले होते. सर्वांच्या मताचा विचार करुन माझे एकट्याचेच नाव दिल्लीला पाठवण्यात आले. पण अनपेक्षितपणे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला. तरीही आम्ही यावरुन वाद घालण्यापेक्षा आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, असल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
तुम्हाला कामावरुन कोण काढतं तेच पाहतो! डॉक्टरांची निवडणूक ड्युटी, राज ठाकरे भडकले
दरम्यान, सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठा पणाला लावून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासाठी आता बंधू प्रतीक पाटील यांनी आज सकाळीच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.