सलीम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचं नाव, सभागृहात खडाजंगी, निलम गोऱ्हेंची परब, जगतापांना तंबी

  • Written By: Published:
सलीम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचं नाव, सभागृहात खडाजंगी, निलम गोऱ्हेंची परब, जगतापांना तंबी

Vidhan Parishad debate on Salim Kutta : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसेंनी यांनी केला होता. याच मुद्दावरून गेले दोन दिवस भाजप आणि ठाकरे गटांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, आज भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता… सलीम कुत्ता, अशी नारेबाजी विधानभवन परिसरात केली. विधानपरिषदेतही सलीम कुत्ता प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली.

CM Shinde : गडचिरोलीतील नक्षल पिडीत, शरणार्थींसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! 

सलीम कुत्ता प्रकरणात भाजपकडून ठाकरे गटावर टीका केली जात असतांना आता एकनाथ खडसेंसह, अनिल परब, अंबादास दानवे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाना साधला. आज विधानपरिषेद खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. खडसेंनी महाजन आणि कुत्ता यांचा फोटो विधानपरिषदेत दाखवून खळबळ उडवून दिली.

महाजन यांचीही चौकशी व्हावी- खडसे
गिरीश महाजन यांचा सलीम कुत्ताशी संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यावर दहशतवादविरोधी गुन्हा दाखल करण्यात यावा. मंत्री महाजन आणि कुत्ता यांचा फोटो समोर आला आहे. बडगुजर यांचं नाव घेतले तर गिरीश महाजन यांचे नाव का नाही? बडगुजर यांच्या चौकशीबरोबरच महाजन यांचीही चौकशी व्हावी, त्याचं सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हेय यांनी तातडीने या प्रकरणाच्या एसआयटी तपासाचे आदेश द्यावेत, असंही ते म्हणाले.

कामकाज तहकुब
दरम्यान, खडसेंच्या आरोपानंतर विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. खडसेंनी आरोप मागे घ्यावेत, यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. यानंतर विधान परिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. खडसेंच्या मागणीनंतर सभापती नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ खडसे यांना गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता सोबतचे फोट दाखवू नका, असे निर्देश दिले आहेत. गोऱ्हे यांनी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेली 289 ची चर्चा फेटाळून लावली.

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मुंबईत पुन्हा एकदा स्पेशल स्क्रीनिंग 

ठाकरे गट आक्रमक
कामकाज पुन्हा सुरू अंबादास दानवे हेही याच मुद्यावर बोलले. ते म्हणाले की, एक लग्न 2017 मध्ये लग्न झाले होते. इक्बाल कासकर यांची सून आली होती. आयबीचे अधिकारी या लग्नाला हजर होते. त्यांच्यावर कारवाई झाली. सलीम कुत्ता सोबतच सुधाकर बडगुजर यांचा फोटो व्हायरल झाला आहे. आता महाजन यांचाही कुत्ता सोबतचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं त्यांची चौकशी व्हावी, असं ते म्हणाले.

तर परब म्हणाले, जे पोलिस लग्नाला गेले, त्यांच्यावर कारवाई होते. नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध होता, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मग आता महाजन यांची एसआयटी चौकशी करा

प्रवीण दरेकर म्हणाले, एकच विषय सगळेच जण मांडत आहे. अशा पद्धतीने चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तर नोटीसी द्यावी लागले, मात्र, विरोधी सदस्यांनी नोटीस दिली नाही. हा रेकॉर्डवरचा विषय काढून टाका, असं दरेकर म्हणाले.

शंभुराज देसाई म्हणाले की, नेते मंडळी विविध विवाह सोहळ्यांना हजेरी लावतात. तेथे अनेक लोक संपर्कात येतात. तिथे फोटो काढले जातात. ज्या व्यक्तीचे नाव सभागृहात घेतले. तो कुठेही लग्नात जेवण करताना दिसला नाही. पण, एका पक्षाचे महानगर प्रमुख नाचताना दिसत आहेत. सभागृहात एका मंत्र्याचा विनाकारण उल्लेख करण्यात आला असून तो तात्काळ काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली.

सभापती काय म्हणाल्या?
उद्धव ठाकरेंच्या समोर तुम्ही फक्त इप्रेंशन मारताय. सुलीम कुत्ता प्रकरणावरून कारण नसतांना राजकारण केलं जातं. तुम्ही फक्त मलिकांच्या संदर्भातला वचपा काढताय. तुम्हाला बोलण्याची संधी दिली. मात्र, तुम्ही फक्त राजकारण करताय. समाजामध्ये गैरसमज वाढवता आहात. अनिल परब, भाई जगताप, विलास पोतनीस आपण गोंधळा घालताय. हा गोंधळ थांबवा. अन्यथा हक्कभंगाची कारवाई करावी लागले, असा इशारा सभापती गोऱ्हेंनी दिला.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube