हा धक्का नाही! भाजप अन् निवडणूक आयोग यांचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं… राऊतांची बिहार निकालांवर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 14T134822.076

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीएच्या बाजूने जात असल्याचं सध्याचं तरी चित्र आहे. त्यामध्ये आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते असं ते म्हणालेत

त्याचबरोबर एकदम महाराष्ट्र पॅटर्न असं म्हणत, जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवलं असंही ते म्हणालेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला. महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांमध्ये आटोपलेली. त्यावेळी भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेलला. भाजपने 125 पेक्षा जास्ता जागा जिंकल्या.

बिहारमध्ये पुन्हा नवीन ट्विस्ट, JDU 12 जागांवर 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर

भाजपप्रणीत एनडीए 195 आणि काँग्रेस प्रणीत महाआघाडीला फक्त 38 जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे 90, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 81, एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर आघाडीवर आहे. तेच लालू प्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दलाला 28, काँग्रेसला 5 आणि डावे 4 जागांवर आघाडीवर आहेत.

follow us