मोठी बातमी : सेबीचा अंबानींना दणका; 25 कोटी दंडासह 5 वर्षांतपर्यंत शेअर बाजारात बॅन
नवी दिल्ली : बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (Sebi) उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांना कंपनीकडून निधी वळवल्याबद्दल पाच वर्षांसाठी सूचीबद्ध कंपन्यांमध्ये नोंदणीकृत मध्यस्थ म्हणून सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंध घातले आहे. तसेच, सेबीने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटीज मार्केटमधून सहा महिन्यांसाठी बंदी घालत 6 लाखांचा दंड ठोठावला आहे. (Sebi Imposes 5 Year Trading Ban On Anil Ambani, fines Rs 25 crore)
SEBI bans Industrialist Anil Ambani, 24 other entities, including former officials of Reliance Home Finance from the securities market for 5 years for diversion of funds, imposes fine of Rs 25 cr on Anil Ambani pic.twitter.com/XYXk21pqz2
— ANI (@ANI) August 23, 2024
सेबीने 222 पानांच्या अंतिम आदेशात म्हटले आहे की, अनिल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापकीय पदांवर नियुक्त केलेल्या लोकांची मदत घेऊन फसवणूक केली. अशा प्रकारे त्यांनी मिळून रिलायन्स होम फायनान्सचे पैसे इकडून तिकडे वळवले. त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्जाच्या नावाखाली हा पैसा इकडे तिकडे वळवण्यात आला. सेबीच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या बोर्डानेही त्या कामांवर तीव्र आक्षेप नोंदवला, परंतु व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. नियामकाने ही कंपनीच्या कामकाजातील गंभीर अनियमितता मानली आहे.
मोठी बातमी : नेपाळमध्ये भीषण अपघात; 40 भारतीयांना घेऊन जाणारी बस कोसळली; 14 ठार
कोट्यवधींचा दंडही ठोठावला
अनिल अंबानींव्यतिरिक्त, ज्या लोकांवर SEBI ने दंड आणि बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत त्यात रिलायन्स होम फायनान्सचे माजी अधिकारी अमित बापना (रु. 27 कोटी), रवींद्र सुधाळकर (रु. 26 कोटी) आणि पिंकेश आर शाह (21 कोटी) यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्स लिमिटेड आणि रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.