SEBI प्रमुख पुन्हा अडचणीत, हिंडेनबर्गनंतर नव्या अहवालाने वाढवले टेन्शन?

SEBI प्रमुख पुन्हा अडचणीत, हिंडेनबर्गनंतर नव्या अहवालाने वाढवले टेन्शन?

Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गने (Hindenburg) केलेल्या दाव्यानंतर चर्चेत आलेल्या सेबीच्या (SEBI) प्रमुख माधवी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माधवी पुरी यांनी सेबीमधील आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात कंसल्टेंसी फर्म कंपनीकडून रेवन्यू मिळवणे सुरु ठेवले असल्याचा खुलासा रॉयटर्सने दिलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2017 मध्ये माधवी पुरी सेबीमध्ये रुजू झाल्या होत्या तर मार्च 2022 त्यांची निवड सेबी प्रमुख म्हणून करण्यात आली होती. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे उपलब्ध कागदपत्रांची रॉयटर्सकडून तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये असं आढळले की, Agora Advisory Pvt Ltd ने गेल्या सात वर्षांत $442,025 कमावले आणि हे सेबीच्या संभाव्य नियमांचे उल्लंघन आहे. Agora Advisory Pvt Ltd मध्ये माधवी पुरी बुच यांची तब्बल 99 टक्के भागीदारी होती. रॉयटर्सच्या या तपासात या रेवन्यूचा आणि अदानी ग्रुपचा कोणताही संबंध नाही अशी देखील माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

काय आहे सेबीचे नियम?

सेबीच्या 2008 च्या नियमांनुसार, सेबीमध्ये काम करणारा कोणताही अधिकारी अशा पदावर राहू शकत नाही ज्यातून त्यांना नफा मिळत असेल किंवा पगार किंवा किंवा इतर व्यावसायिक फी मिळवत असेल. हिंडेनबर्गच्या अहवालाला उत्तर देत माधवी पुरी बुच यांची सांगितले होते की, Agora Advisory Pvt Ltd ची माहिती सेबीला देण्यात आली होती आणि 2019 मध्ये पती युनिलिव्हरमधून निवृत्त झाल्यानंतर ही कंपनी हाताळत आहे. अशी माहिती सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांनी दिली होती. तर दुसरीकडे रॉयटर्सच्या अहवालावर आत्तापर्यंत माधवी पुरी बुच किंवा सेबीकडून कोणतेही विधान आलेले नाही.

अंधारे – धंगेकरांकडून गंभीर आरोप करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला ‘बक्षिशी’, विशेष पुरस्कार जाहीर

काय आहे प्रकरण ?

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात सिंगापूरची अगोरा पार्टनर्स आणि भारताची अगोरा ॲडव्हायझरी कंपनी माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती चालवत होते असा आरोप हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात केला होता. हिंडेनबर्गने सिंगापूर कंपनीच्या रेकॉर्डच्या आधारे या अहवालात म्हटले होते की, माधवी पुरी बुच यांनी मार्च 2022 मध्ये अगोरा पार्टनर्समधील त्यांचा हिस्सा त्यांच्या पतीकडे हस्तांतरित केला होता. मात्र त्यांची अगोरा ॲडव्हायझरीमध्ये हिस्सा होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube