शेअर बाजारात तेजी, राहुल गांधी मालामाल, अवघ्या 5 महिन्यांत कमावला 46.5 लाखांचा नफा

शेअर बाजारात तेजी, राहुल गांधी मालामाल, अवघ्या 5 महिन्यांत कमावला 46.5 लाखांचा नफा

Rahul Gandhi Profit At Stock Market :  भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे सध्या गुंतवणूकदार मालामाल होत आहे. यामध्ये काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा देखील समावेश आहे. राहुल गांधी यांनी गेल्या पाच महिन्यात शेअर बाजारातून तब्बल 46.49 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. लोकसभा निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या नामांकनात नोंदवलेल्या शेअर्सच्या आधारे हा डेटा देण्यात आला असल्याची माहिती IANS ने दिली आहे.

IANS ने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे 15 मार्च 2024 रोजी पोर्टफोलिओचे मूल्य सुमारे 4.33 कोटी रुपये होते तर 12 ऑगस्ट 2024 राहुल गांधींच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4.80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स समाविष्ट आहेत

IANS कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये Asian Paints, Bajaj Finance, Deepak Nitrate, Divi’s Labs, GMM Foudler, Hindustan Unilever, Infosys, ITC, TCS, Titan, Tube Investments आणि LTI Mindtree सारख्या शेअर्स समावेश आहे.याच बरोबर व्हर्टोस ॲडव्हर्टायझिंग आणि विनाइल केमिकलसारख्या अनेक छोट्या कंपन्या त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहेत.

तर दुसरीकडे राहुल गांधी LTI माइंडट्री, टायटन, TCS आणि नेस्ले इंडियाबाई शेअर्समध्ये नुकसान सहन करत आहे. तर इतर कंपन्यांमध्ये राहुल गांधी नफ्यात आहेत. सध्या भारतीय शेअर्स बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने गेल्या काही महिन्यांत नवे उच्चांक गाठत अनेक विक्रम मोडले आहेत.

तर दुसरीकडे यूएस शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गने लावलेल्या सेबी प्रमुखांविरुद्धच्या आरोपांची JPC चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

हिंडेनबर्गच्या आरोपांनी खळबळ, अदानींना 53 हजार कोटींचे नुकसान, तरीही बाजाराने दाखवला दम

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, शेअर बाजारात लहान गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सेबीवर आहे मात्र सेबीच्या प्रमुखांविरुद्धच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे आणि याची चौकशी JPC कडून सरकारने कारवी अशी मागणी त्यांनी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube