‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला

‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला

Jitendra Awad On Tanaji Sawant : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (NCP) त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. तर यानंतर तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा असं म्हटले आहे त्यामुळे आणखी एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. यातच आता या प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हड (Jitendra Awad) यांनी देखील तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्रात गरिबांना किंमत नाही म्हणून ते असं म्हटले असेल अशी टीका जितेंद्र आव्हड यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. तसेच महायुतीवर केलेल्या वक्तव्यांवर देखील जितेंद्र आव्हड यांनी टीका केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, महायुतीमधील एका सहकार्याबद्दल असं बोलणे योग्य नाही, हे माणुसकीला शोभणारं नाही. अजित पवार यांनी तुमचे काम केलं नाही म्हणून तुम्हाला उलटी येते का? दुर्देवाने अजित पवार यांच्या बाजूनने बोलणारे माणसे धुमधडाकाची नाही आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये तानाजी सावंत यांच्यावरून भांडण झाले असेही आव्हाड म्हणाले. आम्हाला त्यांच्यामध्ये काही बोलायचे नाही.

लढताय पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या आम्हाला याबद्दल काहीच म्हणायचे नाही असं देखील जितेंद्र आव्हड माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच तानाजी सावंत यांची प्रत्येक फाईल अजित पवार यांच्याकडे जाते तेव्हा फाईलवर उलट्या असतात का? असा देखील सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राज्यातील जनतेशी माफी का? मागितली असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माफी मागायची नव्हती त्यांना फक्त वाद निर्माण करायचा होता असा आरोप देखील माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हड यांनी केला.

हर्षवर्धन पाटील देणार धक्का, अधिवेशनाला मारली दांडी, भाजपात चाललं तरी काय?

तसेच सावरकरांचा प्रश्न चर्चेत नव्हता ते चर्चेत का आणले? सावरकरांचा प्रकरण लोकसभा निवडणुकीपूर्वी संपला होता त्याला पुन्हा चर्चेत का ? आणलं असा सवाल देखील माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना विचारला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube