महायुतीत शाब्दिक युद्ध! भुजबळ म्हणाले, महायुतीचं नुकसान टाळायचं असेल तर..

महायुतीत शाब्दिक युद्ध! भुजबळ म्हणाले, महायुतीचं नुकसान टाळायचं असेल तर..

Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच (Maharashtra Elections) महायुतीत धुसफूस वाढू लागली आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्याचं वास्तव अजूनही भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पचवता आलेलं नाही. कार्यकर्तेच नाही तर नेते मंडळीही नाराजी बोलून दाखवत असतात. मागील काही दिवसांचं राजकारण पाहिलं तर शिंदे आणि भाजपचे (BJP) नेते राष्ट्रवादीची कोंडी करताना दिसत आहेत. त्यांच्याकडून अशी काही वक्तव्ये केली जात आहेत ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस उघड होऊ लागली आहे. सध्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि भाजप नेते गणेश हाके यांच्या वक्तव्यांनी राजकारणाचा पारा चढला आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समज द्यावी अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.

छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश! 

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि भाजप नेते गणेश हाके यांनी केलेल्या वक्तव्यांवर पत्रकारांनी विचारले असता भुजबळ म्हणाले, कोण काय बोलतंय याचा विचार महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केला पाहिजे. अशी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या लोकांना अशी वक्तव्ये करण्यापासून थांबवलं पाहिजे. नेते जरी सांगत असले की त्यांच्या वक्तव्यांचा पक्षाशी संबंध नाही पण तरीही अशा वक्तव्यांनी मनं दुखावली जातात. निवडणूक काळात आपण एकसंध आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे. अशा वेळी आपल्यातील भांडणाची मजा विरोधी पक्ष घेणार याचं नुकसान महायुतीला होणार आहे. त्यामुळे याबाबत काय ते ठरवून तशा सूचना संबंधितांना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सगळ्याच नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी आणि आपापल्या मतदारसंघांकडे लक्ष द्यावं.

आता राजकारण थांबवा, भुजबळांची विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काल महाराष्ट्रात होते. पालघर येथील सभेत त्यांनी पुतळा कोसळल्याच्या घटनेबद्दल माफी मागितली. तरी देखील विरोधकांकडून या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे, असे विचारले असता भुजबळ म्हणाले, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी सुद्धा माफी मागितली आहे. यापेक्षा आणखी काय करायला हवं. विरोधकांपैकी कुणीही नेव्हीला दोष देत नाही आणि देऊही नये. कारण ते जे जवान आहेत ते तुमच्या आमच्यासाठी जीव धोक्यात घालून लढत असतात.

कदाचित त्यांनी पुतळ्या संदर्भातलं काम व्यवस्थित जमलं नसेल. म्हणून काय आपण नेव्हीला दोष देतो का? या घटनेत माफी सुद्धा मागितली आता यापेक्षा आणखी काय करायला हवं हे त्यांनीच सांगावं. ज्यांनी कुणी पुतळा बसवला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या मुद्द्यावर आणखी राजकारण तापवण्याची काहीच गरज नाही असे भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ तुला चष्मा उचलना..तलवार कधी उचलायची; जरांगेंची खोचक टोलेबाजी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube