हरियाणात भाजपला धक्का, मोदी मॅजिक ठरणार फेल? जाणून घ्या नवीन ओपिनियन पोल

हरियाणात भाजपला धक्का, मोदी मॅजिक ठरणार फेल? जाणून घ्या नवीन ओपिनियन पोल

Haryana Opinion Poll 2024 : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर 4 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी हरियाणामध्ये कोण बाजी मारणार याकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सत्ताधारी भाजपला (BJP) पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळणार की 10 वर्षांनंतर काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा सत्तेत येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर ‘लोक पोल’ने (Lok Poll) हरियाणाबाबत सर्वेक्षण केले आहे. या नवीन ओपिनियन पोलमुळे भाजपच्या चिंतेत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. ‘लोक पोल’ने या ओपिनियन पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागांवर विजय मिळणार याचे अंदाज व्यक्त केले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील 67,500 लोकांचे मत जाणून घेतले आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा

‘लोक पोल’ च्या नवीन ओपिनियन पोलनुसार यावेळी हरियाणामध्ये भाजपला मोठा फायदा बसणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 58-65 जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला 20-29 जागा मिळण्याचा अंदाज ‘लोक पोल’ च्या नवीन ओपिनियन पोलने वर्तवला आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसला 46-48 % मत मिळू शकते आणि भाजपला 35-37 % मत मिळू शकते. तर या पोलनुसार तीन ते पाच जागा इतरांनाही मिळणार असल्याचा अंदाज ‘लोक पोल’ च्या ओपिनियन पोलने वर्तवला आहे.

‘लोक पोल’ च्या ओपिनियन पोलनुसार हरियाणामध्ये यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे तर जेजेपी आणि आयएनएलडीसारख्या पक्षांचा प्रभाव फार कमी दिसण्याची शक्यता आहे. ‘लोक पोल’ ने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान हे पोल करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत जाट, जाट शीख आणि जाटव मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतदान करणार असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube