चंद्राबाबू नायडूंना चार, तर नितीशकुमारांना दोन मंत्रिपदे ! ‘ही’ खास व्यक्तीही मंत्रिमंडळात

  • Written By: Published:
चंद्राबाबू नायडूंना चार, तर नितीशकुमारांना दोन मंत्रिपदे ! ‘ही’ खास व्यक्तीही मंत्रिमंडळात

नवी दिल्लीः येत्या रविवारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिपदासाठी काही जणांचा शपथविधी होणार आहे. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टीचे ( TDP) दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त पक्षाला तिसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. त्यामुळे एनडीए (NDA) सरकारचे भवितव्य या दोघांवर अंवलबून आहे. नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रिमंडळात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला दोन मंत्रिपदे निश्चित झाले आहेत. त्यांचे नावे ही निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

“मंत्रिपदात रस नाही, मी राज्यात पक्षविस्तार करणार”; श्रीकांत शिदेंनी स्पष्टच सांगितलं

टीडीपी पक्षाकडून राम मोहन नायडू, हरीश बालयोगी आणि दग्गुमल्ला प्रसाद या तिघांची नावे निश्चित झाली आहेत. तर एकाचे नाव निश्चित व्हायचे आहे. तर नितीशकुमार यांच्याकडून ललन सिंह आणि राम नाथ ठाकूर दोन अनुभवी नेत्यांचे नावे देण्यात आली आहेत. ललन सिंह हे बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर राम नाथ ठाकूर हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते भारत रत्न कर्पूरी ठाकूर यांचे पूत्र आहेत. एनडीएच्या बैठकीमध्ये शनिवारी हे नावे निश्चित करण्यात आले आहेत.

महायुतीत वादाची ठिणगी! लोकांच्या पालख्या आम्ही का वाहायच्या? भाजपचा रोख कोणावर?

टीडीपीला चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर लोकसभा अध्यक्षपदही टीडीपी मागत आहेत. टीडीपीचे एनडीएमध्ये 16 खासदार आहेत. ते आंध्र प्रदेशमधून निवडून आलेले आहेत. तर नितीशकुमार यांच्या पक्षाचे बारा खासदार निवडून आले असून, त्यांना दोन मंत्रिपदे मिळत आहेत.


चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार किंगमेकर

भाजपने 240 जागा जिंकलेल्या आहेत. तर सरकार स्थापनेसाठी 272 खासदारांचे बहुमत हवे आहे. एनडीएला 293 जागा मिळालेल्या आहेत. एनडीएकडे बहुमत आहे. परंतु एकट्या भाजपला बहुमत नाही. त्यामुळे 16 खासदार असलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे दोघे आता सरकारमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत.

नेहरूनंतर मोदीच, शेजारचे राष्ट्रप्रमुख आमंत्रित

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधीच्या सोहळ्याला बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भुतान, मालदीव, मॉरिशस या देशातील प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube