पैसे तयार ठेवा, सप्टेंबरमध्ये बाजारात येत आहे ‘ह्या’ शानदार बाइक्स; पहा संपूर्ण लिस्ट
Upcoming Bikes In September : सप्टेंबर महिन्यात जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन बाइक (New Bike) किंवा स्कूटर खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात पुढील महिन्यात एकापेक्षा एक मस्त मस्त बाइक्स आणि स्कूटर लाँच होणार आहे. यामध्ये जावा , रॉयल एनफिल्ड आणि बजाजच्या बाइक्सचा समावेश आहे.
2024 Hero Destini 125
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरोकडून मोठा धमाका करण्यात येणार आहे. कंपनी आपली नवीन स्कूटर 2024 Hero Destini 125 लाँच करणार आहे. माहितीनुसार या स्कूटरला साइड लाइन आणि बॉक्सियर लुक देण्यात येणार आहे. या स्कूटरमध्ये 124.6cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार आहे जे 9bhp पॉवर आणि 10.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 80 हजार ते 85 हजारांदरम्यान असून शकते.
New Jawa 42
बाजारात जावाची नवीन बाइक New Jawa 42 03 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. ग्राहकांनाआकर्षित करण्यासाठी या बाइकमध्ये कंपनीने 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 22.2bhp पॉवर आणि 28.2Nm टॉर्क जनरेट करणार आहे त्याच बरोबर या बाइकचे इंजिन 6-स्पीड युनिटशी जोडलेले आहे. माहितीनुसार, या बाइकची किंमत 2 लाख ते 2.10 लाखांदरम्यान असणार आहे.
Royal Enfield Classic 350
तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी Royal Enfield देखील आपली नवीन बाइक Royal Enfield Classic 350 लाँच करणार आहे. ग्राहकांना या बाइकमध्ये 349cc सिंगल-सिलेंडर J-सिरीज इंजिन मिळणार आहे जे 20.2 bhp आणि 27 Nm टॉर्क जनरेट करेल. बाजारात या बाइकची किंमत 1.93 लाखांपासून सुरु होणार अशी माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला होणार नाही मतदान; जाणून घ्या नवीन तारीख
Bajaj Ethanol Bike
बजाजकडून नुकतंच देशातील पहिली सीएनजी बाइक बाजारात लाँच करण्यात आली आहे. तर आता कंपनी आपली पहिली इथेनॉल बाइक लाँच करणार आहे. सध्या या बाइकच्या लाँचची तारीख समोर आलेली नाही. माहितीनुसार, या बाइकमध्ये देखील सीएनजी बाइक सारख्या फीचर्स मिळू शकतात.