80 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या ‘या’ शानदार बाइक्सना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Cheapest Bike In India : भारतीय बाजारात आज दमदार मायलेज, स्टाईल्स लूकसह एकापेक्षा एक जबरदस्त बाइक्स (Bikes) उपल्बध आहे. यातच जर तुम्ही तुमच्यासाठी 1 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये नवीन बाइक खरेदी करण्याची तयारी करत असाल तर या लेखात जाणून घ्या भारतीय बाजारात एप्रिल महिन्यात सार्वधिक विक्री होणाऱ्या बाइक्सबद्दल सविस्तर माहिती.
एप्रिल महिन्यात देशात सर्वात जास्त विक्री होणारी बाइक Hero Splendor ठरली आहे. यानंतर ग्राहकांनी बजाज पल्सर, होंडा शाइन, हिरो एचएफ डिलक्स सारख्या बाइक्स खरेदीसाठी ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.
Hero Splendor
भारतीय बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून Hero Splendor राज्य करत आहे. एप्रिल महिन्यात तब्बल 3,20,959 ग्राहकांनी ही दमदार बाइक खरेदी केली आहे. आज भारतीय बाजारात 4 सिरीजमध्ये Hero Splendor बाइक विकली जात आहे. बाजारात Hero Splendor Plus ची एक्स शोरुम किंमत 75,441 ते 76,786 रुपयांपर्यंत आहे. तर Hero Splendor Plus XTEC एक्स शोरुम किंमत 79,911 पर्यंत जाते. Hero Super Splendor ची एक्स शोरूम किंमत 80,848 ते 88,328 पर्यंत जाते आणि Hero Super Splendor XTEC ची एक्स शोरुम किंमत 85,178 ते 89,078 पर्यंत जाते.
Bajaj Pulsar
एप्रिल 2024 मध्ये भारतीय बाजारात Hero Splendor नंतर सर्वात जास्त विक्री होणारी बाइक म्हणून Bajaj Pulsar आहे. गेल्या महिन्यात या बाइकला तब्बल 1.85 लाख ग्राहकांनी खरेदी केली आहे.
Honda Shine
Honda Shine ला एप्रिल महिन्यात 1.42 लाखांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये Honda Shine तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाइकमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि दमदार इंजिन मिळत असल्याने या बाइकची मागणी झपाट्याने वाढत आहे.
Hero HF Deluxe
तर एप्रिल महिन्यात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये चौथ्या क्रमांकावर Hero HF Deluxe चा क्रमांक येतो. या बाइकला गेल्या महिन्यात 97,048 ग्राहकांनी खरेदी केली आहे.
रसिकांच्या भेटीसाठी पुन्हा येणार ‘गेला माधव कुणीकडे’! ‘या’ दिवशी होणार नाटकाचा शुभारंभ
TVS Raider
भारतीय बाजारात एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्समध्ये पाचव्या क्रमांकावर TVS ची दमदार बाइक TVS Raider आहे. या बाइकला एप्रिल महिन्यात 51,098 ग्राहक मिळाले आहे.