हॉस्टेलवर सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच केला घात; कपडे बदलतानाचे व्हिडिओ-फोटो काढले अन्…

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी मुलगी या एम.जी.एम हॉस्टेलमध्ये रूममेट म्हणून एकत्र राहत होत्या.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 24T163355.246

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-8 परिसरात (Crime) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीसोबत एकाच रूममध्ये राहणाऱ्या मैत्रिणीने विश्वासघात केला आहे. हॉस्टेलवर राहणाऱ्या एका तरुणीनं आपल्या रूममेटचे कपडे बदलतानाचे गुपचूप व्हिडिओ आणि फोटो काढून ते आपल्या एका प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी मुलगी या येथील एका विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रूममेट म्हणून एकत्र राहत होत्या. 18 जानेवारी रोजी, पीडित तरुणी कपडे बदलत असताना तीची मैत्रिण असलेल्या सुनीताने (नाव बदललेलं आहे) संधी साधून आपल्या मोबाईलमध्ये तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ टिपले. हे व्हिडिओ तिने तात्काळ तिचा प्रियकर विनोद (नाव बदललेल आहे) याला पाठवून दिले.

खैरे अन् दानवेंच्या वादाचा फटका; छत्रपती संभाजीनगरची महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली

या प्रकारानंतर हा प्रकार पीडितेच्या लक्षात आला. तिने जेव्हा सुनीताला विचारलं की ‘तू माझे फोटो आणि व्हिडिओ का काढले? आणि ते प्रियकराला का पाठवले?’ तेव्हा सुनीताने आणि तिचा मित्र विनोदने तिला सहकार्य करण्याऐवजी उलट मारहाण केली. इतकंच नाही तर ‘जर तू याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिलीस, तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सुनीता आणि विनोदला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

follow us