मुलाचं गुपीत माहिती असताना थाटामाटात केला विवाह; तपासणी करताच तरुणीला बसला धक्का

या प्रकरणात सासरच्या मंडळींनी नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 27T155418.715

छत्रपती संभाजीनगर शहरात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. (Crime) मुलाचे नपुंसकत्व लपवून थाटामाटात विवाह लावून देत तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर पतीने शरीरसंबंध टाळण्यासाठी नवस असल्याचं खोटं कारण पुढे करत विवाहितेला मानसिक त्रास दिला.

या बनावामागचे सत्य उघड होताच पीडितेला मोठा धक्का बसला. या प्रकरणात सासरच्या मंडळींनी नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप असून, याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिलेचा विवाह 20 मे 2025 रोजी झाला होता. विवाहानंतर पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आणि आपण नवस केला असल्याचं कारण सांगितलं. संशय वाढल्यानंतर पीडितेने पतीला वैद्यकीय उपचार घेण्याचा आग्रह धरला असता, तिला मारहाण करण्यात आली.

पदावर ताशेरे ओढले मग तुम्ही कायद्यात काय बदल केला? दीप्ती मगरच्या कुटुंबाचा चाकणकरांना सवाल

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, पती नपुंसक असून ही बाब लग्नापूर्वीच सासरच्या मंडळींना माहित होती. तरीही ही महत्त्वाची माहिती लपवून तरुणीशी विवाह लावून देण्यात आला, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही फसवणूक इथेच थांबली नाही. सासरच्या मंडळींनी नाशिकमधील खुटवडनगर परिसरात फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपयांची मागणी केली.

जोपर्यंत माहेरून पैसे येत नाहीत, तोपर्यंत शरीरसंबंध होणार नाहीत, असा जाच विवाहितेला देण्यात आल्याचे तिने तक्रारीत नमूद केलं आहे. या काळात सासरच्यांनी तिचे सोन्याचे दागिने तसेच शैक्षणिक कागदपत्रेही बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत पतीवर आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. पतीचे त्याच्या जवळच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचं तिचं म्हणणं आहे.

6 सप्टेंबर 2025 रोजी तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती, सासू, दीर, जाऊ, नणंद यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 20 मे 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत हा छळ आणि फसवणूक सुरू होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

follow us