Video: धोनीचे बाईक कलेक्शन पाहून हैराण झाला ‘हा’ खेळाडू म्हणाला…
MS Dhoni Bike Collection : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाइक आणि कारचा शौक आहे. ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. धोनीचे बाइकवरील प्रेम अनेकदा समोर येते. रांचीमध्ये धोनीच्या घरात (कैलाशपती) एक मोठे गॅरेज आहे, जिथे तो त्याची सर्व वाहने पार्क करतो. या गॅरेजचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. आता माजी भारतीय क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने या गॅरेजचा व्हिडिओ शेअर केला आहे.
माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने अलीकडेच धोनीची रांची येथील त्याच्या घरी त्याचा सहकारी आणि माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशीसह भेट घेतली. यादरम्यान त्याने धोनीचे गॅरेजही पाहिले आणि ते पाहून आश्चर्यचकित झाले. यानंतर त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. धोनीच्या गॅरेजमध्ये बाइक्सचा प्रचंड संग्रह पाहून प्रसाद आणि जोशी आश्चर्यचकित झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतो की ते बाइक शोरूम देखील असू शकते.
‘उसे खैरियत से रखना…’ Gadar 2 मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
One of the craziest passion i have seen in a person. What a collection and what a man MSD is . A great achiever and a even more incredible person. This is a glimpse of his collection of bikes and cars in his Ranchi house.
Just blown away by the man and his passion @msdhoni pic.twitter.com/avtYwVNNOz— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 17, 2023
धोनीला ट्विटरवर टॅग करत प्रसादने लिहिले की, “मी क्वचित कोणत्या एका व्यक्तीमध्ये अशी भावना पाहिली आहे. महेंद्र सिंह धोनीचे हे अद्भुत अशा प्रकारचे बाईक कलेक्शन आहे. तो स्वत देखील असामान्य व्यक्ती आहे. महान उपलब्धी प्राप्त करणारा तो एक व्यक्ती आहे. ही त्याच्या बाईक व कार यांच्या संग्रहाची एक झलक आहे.
Subhedar : ‘मावळं जागं झालं रं…’; ‘सुभेदार’ सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
व्यंकटेश प्रसादने शेअर केलेला व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षीने रेकॉर्ड केला होता आणि ती त्याला विचारते, “का माही?” धोनी, एका सामान्य नवऱ्याप्रमाणे उत्तर देतो, “तुम्ही घरातील प्रत्येक जागा आधीच व्यापलेली आहे, मला माझे स्वतःचे काहीतरी हवे होते, तुम्ही फक्त तीच परवानगी दिली होती. धोनीच्या उत्तरावर साक्षी मोठ्याने हसायला लागते आणि प्रसाद व जोशी दोघेही आश्चर्याने आजूबाजूला पाहतात.