‘उसे खैरियत से रखना…’ Gadar 2 मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘उसे खैरियत से रखना…’ Gadar 2 मधील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Gadar 2 Khairiyat Out : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी पुन्हा एकदा मोठा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यात आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या गाण्यातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ( Khairiyat second Song Release from Gadar 2 of Sunny Deol )

नगरचं हत्याकांड विधानसभेत गाजलं! थोरातांच्या प्रश्नावर फडणवीसांचा कठोर कारवाईचा शब्द

या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग आणि मिथूनने गायलं आहे. तर हे गाणं मॉन्टी शर्मा यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. सईद काद्री यांनी हे गाणं लिहिलं आहे. आज मंगळवारी 18 जुलैला हे गाणं प्रक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अत्यंत इमोशल गाण्याने प्रेक्षकांना भावूक केले आहे.

काँग्रेसचे मोठं पाऊलं! सत्तेचा लोभ नाही; PM पदाच्या शर्यतीत राहुल गांधी OUT

या गाण्यामध्ये सनी देओल आपल्या पाकिस्तानात अडकलेल्या मुलाला सोडवण्यासाठी निघालेला आहे. तर तो त्याच पत्र वाचत आहे. तो हे पत्र वाचताना अत्यंत भावूक झाला आहे. तर इकडे सकिना देखील आपल्या मुलासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. तसेच या गाण्यात सनी देओल मुलाचे काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट आहेत.

सध्या सनी देओल या चित्रपटाचं प्रमोशन करीत आहे. नुकताच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सनी देओलने गदर2 चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. प्रमोशनदरम्यान, सनी देओलने मोठा खुलासा केला आहे. “गदरचा पहिला भाग प्रदर्शित होण्याची वेळ आली आणि बॉलीवूडमधील काही जणांनी या चित्रपटाचा विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मी सांगितलं की हा पंजाबी चित्रपट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आणि पसंती दिल्याचं सनी देओलने सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube