नगरचं हत्याकांड विधानसभेत गाजलं! थोरातांच्या प्रश्नावर फडणवीसांचा कठोर कारवाईचा शब्द

नगरचं हत्याकांड विधानसभेत गाजलं! थोरातांच्या प्रश्नावर फडणवीसांचा कठोर कारवाईचा शब्द

Balasaheb Thorat on Ahmednagar Violence : नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे दोन हत्याकांड एकापाठोपाठ घडले. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाइपलाइन रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर भाजपशी संबंधित काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चत्तर यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या घटना राज्यभरात गाजल्या. त्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनातही य घटनांचे तीव्र पडसाद उमटले.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या हत्याकांडाचा मुद्दा मंगळवारी अधिवेशनात उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. नगरमधील वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसविण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

थोरात म्हणाले, नगर शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक हत्याकांड घडले. आठ ते दहा जण आले व त्यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, हे हत्याकांड घडले तेव्हा गुन्हेगार देखील घटनास्थळीच उपस्थित होते. यापूर्वी देखील नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर ओंकार भागानगरे या युवकाची भर चौकात हत्या झाली होती.

जयंत पाटील अन् शेलारांनी शंभूराज देसाईंना घेरलं; फडणवीसांनी केली सुटका

नगरमध्ये आमदार, खासदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचा आधार मिळतो की काय अशी लोकांची भावना झाली आहे. गुन्हेगाराला जात, धर्म आणि पक्ष नसतो हे सत्ताधाऱ्यांच्या तोंडून ऐकायचे आहे. चत्तर यांच्य हत्याकांडातील सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी थोरात यांनी केली.

कठोर कारवाई करू, फडणवीसांचा शब्द

थोरात यांनी उपस्थित केलेला नगरमधील गुन्हेगारीचा मुद्दा त्यांचे म्हणणे फडणवीसांना ऐकून घेतले. ते म्हणाले, गुन्हेगारांना जात, धर्म किंवा पक्ष हे काही न पाहता त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसे निवेदनही आज सादर केले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी थोरातांना दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube