किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीच आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याशी संबंधित एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. यामुळे सभागृहात खळबळ उडाली आहे. यावेळी “लाव रे तो व्हिडीओ” अशा घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून गेले होते. (Ambadas Danve Submited a pen drive related to BJP leader Kirit Somaiya to Deputy Speaker Dr. Neelam Gorhe)

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे काही कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यानंतर सोमय्या यांनी एका महिलेवर अत्याचार केले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सभागृहातही या प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या व्हिडिओ प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

ड्रग्जचा सप्लाय रडारवर! रोहित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी सांगितला सरकारचा प्लॅन

विधानसभेत विरोधकांनी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी करण्याची घोषणा केली. तर अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्याशी संबंधित एक पेन ड्राईव्ह सादर करणार असल्याचा दावा केला होता. “किरीट सोमय्या, नागडा तर तु झालेलाच आहे. राहीलं साहिलं आज करतो, पेन ड्राईव्ह घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात!” असं ट्विट दानवे यांनी केलं होतं. यानुसार त्यांनी एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. 

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

याबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, “सोमय्यांच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली आहे. हा एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. व्हिडीओ ब्लर करून चॅनेल्सवरून घराघरात हे शॉर्ट्स दाखवले जातात. आपल्या घरात लहान मुले असतात. ते पाहतात. मी विनंती करीन की तुम्ही व्हिडीओ ब्लर करत असला तरीही, व्हिडीओ दाखवत असताना थोडं बंधन ठेवा.

बच्चू कडूंचा मोठा डाव! मंत्रिपदावरील दावा सोडला पण नव्या मागणीनं CM शिंदेंपुढे वाढला पेच

पोलिसांच्या चौकशीत या वाहिन्यांनी गोपनिय स्वरुपात माहिती द्यावी. जेणेकरून पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होईल. तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे फार कठीण परीक्षा आहे माझ्यासाठी. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. त्या महिलेचे तक्रार आली पाहिजे”, असं त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube