बच्चू कडूंचा मोठा डाव! मंत्रिपदावरील दावा सोडला पण नव्या मागणीनं CM शिंदेंपुढे वाढला पेच

बच्चू कडूंचा मोठा डाव! मंत्रिपदावरील दावा सोडला पण नव्या मागणीनं CM शिंदेंपुढे वाढला पेच

मुंबई : प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबतचा नवा डाव टाकला आहे. काल (17 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज (18 जुलै) त्यांची भूमिका जाहीर केली. “मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. (Bachhu Kadu step back from ministry demand but seek ministry for Rajkumar badole)

दरम्यान, मंत्रिपदावरील स्वतःचा दावा सोडला असला तरी बच्चू कडू यांनी नवा डाव टाकतं प्रहार जनशक्ती पक्षाच्या दुसऱ्या आमदाराला मंत्रिपद द्यावं अशी मागणी केली आहे. माझ्या जागी हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री पद अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी माघार घेतल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही नव्या मागणीने त्यांच्यापुढील पेच वाढला असल्याचं दिसून येत आहे.

बच्चू कडू-मुख्यमंत्री शिंदेंची भेट :

मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करत मागील आठवड्यात बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. 17 तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर 18 तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर शिंदेंनी कडू यांना आपल्या गाडीत घेऊन थेट विधानभवन गाठलं.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. 17 तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर 18 तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube