काँग्रेसचे मोठं पाऊलं! सत्तेचा लोभ नाही; PM पदाच्या शर्यतीतून राहुल गांधी OUT

  • Written By: Published:
काँग्रेसचे मोठं पाऊलं! सत्तेचा लोभ नाही; PM पदाच्या शर्यतीतून राहुल गांधी OUT

Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांचे एकत्रित खलबतं सुरू आहेत. या सर्व खलबतांमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस PM पदाच्या शर्यतीत नसल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. काँग्रेसला सत्तेचा लोभ नसल्याचेही खर्गेंनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

विरोधकांची एकजुटीची कसरत सुरू झाल्यापासून आगामी काळात मोदींच्या विरोधात कोण उभे राहणार, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, आता काँग्रेसकडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत वरील भूमिका आल्याने मोदींच्या विरोधात आता कोण असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही. या वक्तव्यानंतर राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना मोठा धक्का बसला आहे.

‘हो आमच्यात मतभेद आहेत पण…’
विरोधी पक्षांच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी या संघटनेच्या अजेंड्यावर भाष्य केले. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, राज्य पातळीवर आमच्यात अनेक मतभेद आहेत हे आम्हाला माहीत आहे, मात्र हा विचारधारेचा लढा नाही. हे मतभेद इतके मोठे नाहीत की त्यावर मात करता येणार नाही. बेरोजगारी, महागाई, तरुणांवरील अत्याचार यासाठी हे मतभेद दूर करता येतील.

नगरचं हत्याकांड विधानसभेत गाजलं! थोरातांच्या प्रश्नावर फडणवीसांचा कठोर कारवाईचा शब्द

आमच्यासोबत 26 पक्ष आहेत, 11 राज्यांमध्ये आमची सरकारे आहेत. भाजपने स्वबळावर ३०३ जागा जिंकल्या नाहीत, त्यासाठी भाजपने आपल्या मित्रपक्षांची मते वापरून सत्तेवर आले आणि नंतर त्यांना सोडून दिले. मात्र, आज भाजप अध्यक्ष आणि त्यांचे नेते जुन्या मित्रपक्षांशी तडजोड करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धाव घेत आहेत. आज प्रत्येक संस्थेला टार्गेट केले जात आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्ससह इतर एजन्सीचा वापर केला जात आहे. राजकारण्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पकडले जात आहे. एवढेच नाही तर खासदारांना निलंबित करण्यासाठी घटनात्मक संस्थांचाही आधार घेतला जात आहे.

अन्य नेत्यांचाही सरकारवर निशाणा
काँग्रेस अध्यक्ष खर्गेंसह अन्य विरोधकांनीदेखील मोदी सरकावर निशाणा साधत हल्लाबोल केला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, देशाच्या संविधानाशी आणि लोकशाहीशी खेळ केला जात आहे. विविधता ही देशाची ताकद आहे, पण आज ती नष्ट होत आहे. ही बैठक पटनामधील सुरुवातीचा पुढचा टप्पा असून, विरोधकांनी एकजूट राहण्याची गरज असल्याचे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube