Alcohol Industry : अब होश ही नशा हैं! Gen-Z चा दारूला ‘गुडबाय’; कंपन्यांचं गणित बिघडलं!
Gen-Z आता हँगओव्हरने जागे होण्यापेक्षा ताजेतवाने वाटणे या तरूणांना अधिक रूचू लागलयं. हा बदल सामाजाच्या दृष्टिने महत्त्वाचा मानला जातोय.
Why Gez-Z Says No To Alcohol : ”नशा शराब मैं होता तो नाचती बोटलं”* हे गाणं तुमच्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल. त्यात विकेंड म्हटलं की, मित्रांसोबत पब, बार किंवा नाईट क्लबमध्ये फुल्ल टू मस्ती आणि चील.. पण आता हे चित्र बदलण्याच्या मार्गावर आहे. कारण जनरेशन झेड म्हणजेच GenZ ने दारूला गुडबाय करत ‘अब होश ही नशा हैं’ असं जाहीर करून टाकलयं. जेनZ च्या या भूमिकेमुळे मात्र, दारू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं टेन्शन चांगलचं वाढलं असून, आर्थिक गणितही बिघडलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
गुडबाय दारूमुळे कंपन्यांचं गणित बिघडलं
जानेवारी 2026 मध्ये फोर्ब्सच्या एका अहवालानुसार, दारूच्या शेअर्समध्ये अंदाजे 830 दशलक्ष डॉलर कमी झाले असून, दिग्गज ब्रँड मानल्या जाणाऱ्या जिम बीम सारख्या ब्रँडनाही उत्पादन थांबवावे लागले आहे. या बदलामागील सर्वात महत्त्वाचा डेटा निल्सन आयक्यूच्या 2025 च्या ऑन-प्रिमाइस रिपोर्टमधून येतो. त्यानुसार, जेन-झी मिलेनियल्सपेक्षा दरडोई 20% कमी अल्कोहोलचे सेवन करत आहे.

जवळजवळ 56% जेन-झी ग्राहक आता चार किंवा पाच स्वस्त पेयांऐवजी एक किंवा दोन उच्च-गुणवत्तेच्या, प्रीमियम कॉकटेलवर पैसे खर्च करणे पसंत करत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे जुन्या काळातील दारूची जादू आता नवीन पिढीसाठी काम करत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणाला कॅफेमध्ये ग्रीन टी किंवा झिरो-अल्कोहोल कॉकटेलसह लॅपटॉपवर काम करताना पहाल तेव्हा समजून घ्या की, ही केवळ एक निवड नाही तर, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक नवीन चेहरा आहे.
जेनझीला दारूची नव्हे तर, योगा अन् जीमची क्रेझ
जनरेशन झेडची जीवनशैली मागील पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. एक काळ असा होता की, तरुणांसाठी वीकेंड म्हणजे मित्रांसोबत पब, बार किंवा नाईट क्लबमध्ये पेये घालवणे असे होते. पण आजचे जेनझेड तरुणांचा घाम गाळण्याकडे अधिक कल असल्याचे समोर आलयं. बारमध्ये वेळ घालवण्याऐवजी, फिटनेस क्लासेस, जिम, योगा आणि पिलेट्स सेंटर हे या तरुणांसाठी जीवनात नव्याने पुढे जाण्याचे ठिकाण बनले आहे. दारू आणि कॉकटेल्सची जागा मॉकटेल्स, ज्यूस आणि नॉन-अल्कोहोलिक पेयांनी घेतली असून, आता हँगओव्हरने जागे होण्यापेक्षा ताजेतवाने वाटणे या तरूणांना अधिक रूचू लागलयं. हा बदल सामाजिक बदलाच्या दृष्टिने महत्त्वाचं पाऊलं मानलं जात आहे.

मजा मस्ती मिड नाईटला नव्हे तर दुपारीच
कधीकाळी मित्रांसोबत मज्जा मस्ती आणि चिल करण्याचं टायमिंग हे रात्री नऊनंतर सुरू व्हायचे मात्र, जेनझेडने याही वेळेला फाटा फोडला आहे. मज्जा मस्ती करण्यासाठी रात्रीच्या स्लॉटऐवजी दुपारी 4 ते 7 या वेळेची या पोरांनी निवड केली आहे. विशेष म्हणचे या बदललेल्या वेळेत बार आणि कॅफेमध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये 34% वाढ झाली आहे. जेव्हा तुम्ही सकाळी हँगओव्हरशिवाय उठता तेव्हा तुमची सर्जनशीलता आणि लक्ष एका वेगळ्या पातळीवर असते हे ब्रिद समोर ठेवून या पिढीने हा बदल घडवला आहे. Why Gez-Z Says No To Alcohol

जागतिक स्तरावर, सॉफ्ट-क्लबिंग आणि अल्कोहोल-मुक्त नेटवर्किंग कार्यक्रम अमेरिका आणि युरोपमध्ये एक प्रमुख बाजारपेठ बनले आहेत. भारतात, विशेषतः बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये, हा ट्रेंड वेगाने वाढत आहे. येथील तरुण आता त्यांचे कष्टाचे पैसे दारूच्या बाटल्यांवर खर्च करण्याऐवजी अनुभवावर आधारित स्थळांवर खर्च करण्याचा विचार करत आहेत.
कंपन्यांनी बदलले त्यांचे मेनू आणि मार्केटिंग
जनरेशन झेडच्या या संयमी विचारसरणीमुळे अल्कोहोल कंपन्यांना त्यांच्या रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. बाजारात टिकून राहयचे असल्यास जुनी पद्धत आता काम करणार नाही हे कंपन्यांना उमजलं आहे. त्यामुळेच कंपन्यांनी आता नॉन-अल्कोहोलिक बिअर, कमी-कॅलरी असलेली पेयं आदीचे उत्पादन करण्यास सुरूवात केलीये. एवढेच नव्हे तर, जाहिरातींचे जगही बदलत आहे. मार्केटिंग आता फक्त ड्रग्ज आणि पार्टी करण्याबद्दल राहिलेले नाही, तर ते संतुलित जीवन आणि जबाबदार निवडींवर भर देत आहे.
शेवटी असं म्हटलं जातं की,
शराब का कोई अपना सरीह रंग नहीं
शराब तजज़िया-ए-एहतिसाब करती है
जो अहले दिल हैं बढ़ाती है आबरू उनकी
जो बेशऊर हैं उनको ख़राब करती है
