तयार राहा, Jio चा IPO ‘या’ दिवशी येणार ; इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो

Jio IPO : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी

Jio IPO

Jio IPO : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनी जिओचा लवकरच आयपीओ येणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जिओचा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी येण्याची शक्यता आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ नुसार, या आयपीओचा साइज 37,700 कोटी रुपये किंवा 4 अब्ज डॉलर्स असू शकतो. जर असं झालं तर हा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो.

माहितीनुसार, अँकर गुंतवणूकदारांना 19 ऑक्टोबर रोजी बोली लावण्याची संधी मिळू शकते. जर Jio चा IPO (Jio IPO) 21 ऑक्टोबर रोजी खुला झाला, तर तो 23 ऑक्टोबर रोजी बंद होईल. शेअर्सचे वाटप 26 ऑक्टोबर रोजी होण्याची आणि लिस्टिंग 28 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कंपनीने अद्याप तारखा किंवा साइजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कंपनी 12 ऑक्टोबरनंतर ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (RHP) दाखल करू शकते. जिओ आयपीओसाठी किंमत (price band) 1,150 ते 1,220 रुपयांच्या दरम्यान असू शकतो. कंपनीने जूनमध्ये IPO साठी सेबीकडे (SEBI) अर्ज केला होता आणि बाजार नियामक संस्थेने 28 ऑगस्ट रोजी या IPO ला मंजुरी दिली होती.

ग्रे मार्केटमध्ये स्थिती बळकट 

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांना ग्रे मार्केटमधून दररोज सकारात्मक बातम्या मिळत आहेत. ‘इन्व्हेस्टर्स गेन’ (Investors Gain) च्या अहवालानुसार, कंपनीचा IPO सध्या ग्रे मार्केटमध्ये 156 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. यापूर्वी GMP प्रति शेअर 148 रुपये होता.

रिलायन्सच्या शेअर्सवर लक्ष ठेवा

कंपनीचा आयपीओ येणार असल्याची बातमी समोर येताच रिलायन्सच्या शेअर्समधील हालचाल वाढली आहे. काल (सोमवारी), कंपनीचे शेअर्स बीएसई (BSE) वर 1,186.10 रुपयांवर बंद झाले, ज्यात 1.72% ची वाढ दिसून आली.

मोठी बातमी, हरमनप्रीत कौरने दिला कर्णधारपदाचा राजीनामा-

देशातील सर्वात मोठा IPO ठरणार

कंपनीचा आयपीओ भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. जरी या IPO चा आकार सुमारे 37,700 कोटी रुपये असला, तरीही तो ह्युंदाईच्या (Hyundai) IPO पेक्षा (ज्याचे मूल्य 27,850 कोटी रुपये होते) लक्षणीयरीत्या मोठा असेल. ह्युंदाईचा IPO 2024 मध्ये आला होता. सर्वात मोठ्या IPOs च्या यादीत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा IPO गेल्या महिन्यात आला होता आणि त्याचे मूल्य 22,562 कोटी रुपये होते.

follow us