शेअर बाजार कोसळला; ‘या’ तीन कारणांमुळे गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

Stock Market Crash : बाजारातील चौफेर विक्रीमुळे मोठ्या कंपन्यांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
SHARE MARKET CRASH

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) या आठवड्यात जोरदार घसरण सुरू आहे. गुरुवारीही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली जोरदार विक्री, ऑटो शेअर्समधील घसरण, अमेरिकन बॉण्ड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि ‘इंडिया VIX’मध्ये झालेली मोठी उसळी यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत. एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 5 लाख कोटींनी घसरले आहेत.

गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत बीएसई सेन्सेक्स तब्बल 1,046.60 अंकांनी घसरून 71,433.69 अंकांवर आला होता. त्यानंतर त्याच काही सुधारणा झाली आहे. बाजार बंद झाला सेन्सेक्स 71909 अंकावर थांबला होता. एक हजार अंकांनी सेन्सेक्स घरल्यानंतर 500 अंकांनी तर एनएसई निफ्टी फिफ्टी 364.50 अंकांनी घसरून 22,255.95 अंकांवर पोहोचली आहे. त्यानंतर थोडी सुधारणा होऊन बाजार बंद झाली तेव्हा निफ्टी 22421 अंकावर आली आहे. या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सुमारे 5 लाख कोटींची घट झाली.


‘नवं कर्ज घेऊ नका, 3 वर्षांचा खर्च बाजूला ठेवा’; राहुल गांधींच्या गुंतवणूक सल्लागाराचा मोठा सल्ला


एका दिवसात गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान

बाजारातील चौफेर विक्रीमुळे मोठ्या कंपन्यांसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक सुमारे 1.36 टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप 1000 निर्देशांक 1.07 टक्क्यांनी घसरला आहे. बाजारातील या घसरणीमागे प्रामुख्याने तीन कारणे असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार विक्री

बाजारातील घसरणीचे पहिले कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) विक्री. यामुळे बाजारावर दबाव आला आहे. 30 सप्टेंबर रोजी FIIs ने सलग पाचव्या सत्रात भारतीय शेअर्सची विक्री केली जात आहे. या एका दिवसात 10,148 कोटींपेक्षा अधिक रकमेचे शेअर्सची विक्री झाली आहे. जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, मागील दोन ट्रेडिंग सत्रांत FIIs ने एकूण 20,128 कोटींची विक्री केली आहे. सातत्याने परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री होत असल्याने भारतीय शेअर बाजार कमजोर झाला आहे.

विक्री कायम राहणार
अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बॉण्डवरील यिल्ड वाढून 5.3 टक्क्यांपर्यंत गेल्याने FIIs कडून भारतीय बाजारातील विक्रीचा दबाव कायम राहण्याची शक्यता असल्याचे व्ही. के. विजयकुमार यांचे मत आहे. मात्र, याचवेळी एक वेगळी बाबही दिसून येत आहे. FIIs दुय्यम बाजारात म्हणजेच स्टॉक एक्स्चेंजवर शेअर्सची विक्री करत असताना प्राथमिक बाजारात म्हणजे आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करत आहेत. तसेच महागड्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही त्यांची गुंतवणूक सुरू आहे.

पुण्यात धाड टाकायला सांगलीचे पथक! तुकाराम मुंडे यांच्या निशाण्यावर ते 12 अधिकारी कोण?


रुपयावर दबाव, डॉलर मजबूत

अमेरिकन बॉण्ड यिल्डमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम डॉलरवरही झाला आहे. डॉलर इंडेक्स तीन महिन्यांहून अधिक काळातील उच्च पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय रुपयावर प्रचंड दबाव वाढला. त्यामुळे गुरुवारी रुपया 0.16 टक्क्यांनी घसरून प्रति डॉलर 95.9850 या पातळीवर आला. रुपया 96 प्रति डॉलरच्या जवळ पोहोचल्याने बाजारातील चिंतेत आणखी भर पडलीय. डॉलर मजबूत झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतातून पैसा काढून अमेरिकेतील गुंतवणुकीकडे वळण्याची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

3. इंडिया VIX मध्ये 11 टक्क्यांची उसळी
बाजारातील भीती आणि अस्थिरता मोजणाऱ्या इंडिया VIX निर्देशांकातही मोठी वाढ झाली. इंडिया VIX जवळपास 11 टक्क्यांनी वाढून 15.01 वर पोहोचला. VIX मध्ये झालेली वाढ म्हणजे बाजारातील अस्थिरता वाढल्याचे संकेत मानले जातात. त्यामुळे आगामी काळात शेअर बाजारात मोठ्या चढ-उताराची शक्यता वाढली असून गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निफ्टीसाठी महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स
एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर. यांच्या मते, निफ्टी 50 आज सुमारे 22,544 च्या पातळीवर कमजोरीसह खुला झाला. त्यानंतर निर्देशांकावर विक्रीचा दबाव कायम राहिला. सध्या 22,500 ते 22,550 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे. निफ्टी या पातळीखाली सातत्याने राहिल्यास विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो आणि निर्देशांक 22,300 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, 22,700 ते 22,800 हा तातडीचा रेजिस्टन्स झोन मानला जात आहे. निफ्टीने 22,800 च्या वर मजबुतीने पुनरागमन केल्यास बाजारात काही प्रमाणात स्थिरता येऊ शकते आणि निर्देशांक 23,000 च्या दिशेने वाटचाल करू शकतो. 23,000 च्या आसपास डेरिव्हेटिव्ह डेटानुसार मोठ्या प्रमाणात कॉल ओपन इंटरेस्ट असल्याने हा स्तर महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो.

RSI काय सांगतो?
निफ्टीचा RSI (Relative Strength Index) सध्या 20 च्या मध्यातील पातळीवर आहे. ही पातळी ओव्हरसोल्ड झोनमध्ये येते. त्यामुळे बाजारातील मंदीचा वेग स्पष्ट होत असला तरी बाजार अतिओव्हरसोल्ड झाल्याने मध्येच काही प्रमाणात रिकव्हरी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.अल्पकालीन तांत्रिक चित्र पाहता निफ्टीवर सध्या मंदीचा दबाव कायम असल्याचे दिसून येत आहे.

follow us