अनेकांना दिलासा, SBI चे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

SBI Home Loan : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) रेपो दरात (Repo Rate) कपात केल्यानंतर आता एसबीआयने देखील ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईत एसबीआयने (SBI) गृहकर्ज (Home Loan) आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) स्वस्त केले आहे.
एसबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एसबीआयने गृह आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर 0.25 % ने कमी केले आहेत. तसेच, एफडी आणि बचत खात्यावरील व्याजही कमी करण्यात आले. एसबीआयचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) आता फक्त 8.25% आहे. म्हणजेच ज्यांना पूर्वी जास्त व्याजदराने त्रास होत होता त्यांना आता दिलासा मिळणार आहे. आता 1-2 वर्षांच्या एफडीवर फक्त 6.70% व्याज मिळेल. तर 2-3 वर्षांच्या एफडीवरील व्याज आता 6.90% पर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करुन निर्णय घ्यावा.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर 2.75% व्याज मिळणार आहे तर 50 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवीवर 3.25 टक्के व्याज मिळणार आहे. तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियाने देखील गृह कर्ज, कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्जांवर व्याजदर 0.25% ने कमी केले आहेत. एसबीआय आणि बीओआयचे नवीन व्याजदर 15 एप्रिल 2025 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा एक व्याजदर आहे ज्यावर देशाची आरबीआय, व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज देते. जेव्हा आरबीआय हा व्याजदर कमी करते तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते. त्यानंतर बँकाही स्वस्त व्याजदराने कर्ज देऊ लागतात. त्यामुळे जर रेपो दर कमी केला तर गृहकर्ज, कार कर्ज, व्यावसायिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये दिलासा मिळू शकतो.
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पोक्सो प्रकरणात 4 वर्षानंतर आरोपीला जामीन
मध्यमवर्गीयांच्या खिशावर कसा परिणाम होतो?
जर आरबीआयने रेपो दर वाढवला तर बँकांना जास्त व्याजदराने कर्ज मिळेल. त्यानंतर बँका जास्त व्याजदर आणि ईएमआयवर कर्ज देतात. रेपो दरातील कपात मध्यमवर्गाच्या खिशावर कसा परिणाम करू शकते हे समजून घेऊया. तुम्ही बँकेकडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 8.70 टक्के व्याजदराने 30 वर्षांसाठी घेतले असेल, तर तुमचा सध्याचा ईएमआय 39,157 रुपये असू शकतो. मात्र जर रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केला तर व्याजदर 8.45 टक्के होईल. त्यानंतर ईएमआय 38,269 रुपये होईल.याचा अर्थ असा की तुम्ही दरमहा 888 रुपये वाचवाल.