RBI on Repo Rate : RBI चा सर्वसामान्यांना धक्का, कर्जाचा EMI जैसे थे ठेवण्याचा निर्णय

RBI Repo Rate सध्या RBI चा रेपो दर 5.50 टक्के आहे. यापूर्वी, ऑगस्टमध्ये, RBI ने देखील आपला धोरणात्मक दर बदलला नव्हता.

  • Written By: Published:
Untitled Design

RBI Repo Rate : सर्वसामान्यांना धक्का देत, आरबीआय एमपीसीने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्जांसाठी ईएमआय (Loan EMI) जैसे थे राहतील आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. RBI च्या सहा पैकी पाच सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या विरोधात मतदान केले. सध्या RBI चा रेपो दर 5.50 टक्के आहे. यापूर्वी, ऑगस्टमध्ये, RBI ने पॉलिसी दरामध्ये कोणताही बदल केला नव्हता. मात्र, यावेळी अनेक अर्थतज्ज्ञांना अशी अपेक्षा होती की, RBI रेपो दरात 0.25 टक्के कपात करून सर्वांना आश्चर्यचकित करेल. मात्र, बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ०.५० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय महागाईचा अंदाज २.६ टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टच्या बैठकीत, हा अंदाज ३.१ टक्के ठेवण्यात आला होता, जो पूर्वीच्या ३.७ टक्क्यांवरून कमी आहे. याचा अर्थ असा की आरबीआय सतत महागाईचा अंदाज कमी करत आहे. रेपो दर स्थिर ठेवण्याव्यतिरिक्त, आरबीआयनं एसडीएफ दर ५.२५% आणि एमएसएफ दर ५.७५% वर कायम ठेवला आहे. एमपीसीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याच्या बाजूनं मतदान केल्याचंही संजय मल्होत्रा म्हणाले. RBI Repo Rate

रेपो रेट म्हणजे नेमके काय?

रेपो रेट हा एक असा दर असतो, ज्यावर बँकांना आरबीआयकडून अल्पकालीन कर्ज मिळते. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असते. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो. या दरावरुन गृह कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होतात.

follow us