कर्ज स्वस्त होणार; RBI तिसऱ्यांदा कमी करणार रेपो दर; जाणून घ्या सर्वकाही

कर्ज स्वस्त होणार; RBI तिसऱ्यांदा कमी करणार रेपो दर; जाणून घ्या सर्वकाही

RBI Repo Rate : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) पुन्हा एकदा ग्राहकांना दिलासा देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरबीआय सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करणार आहे. असा अंदाज आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ महागाई सरासरी 4 टक्केच्या लक्ष्यापेक्षा कमी राहिली आहे. त्यामुळे आरबीआय रेपो दरात पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात करु शकतो.

जर आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) कपात केली तर या वर्षी आतापर्यंत व्याजदरात 0.75% कपात होणार आहे. माहितीनुसार, चलनविषयी धोरण समिती 4 जून रोजी पुढील द्वैमासिक चलनविषय धोरणावर चर्चा सुरु करेल तर 6 जून रोजी निर्णय जाहीर करु शकतो. मंद वाढ आणि नियंत्रित चलनवाढ यामुळे चलनविषयक धोरणात आणखी सुलभता येण्यास जागा उपलब्ध आहे असं तज्ञांचा मत आहे.

भारताचा GDP विकास दर गेल्या वर्षीच्या 9.2% वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 6.5% पर्यंत मंदावला, जरी मार्च तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगला 7.4% वाढ झाली. दरम्यान, चलनवाढ आरबीआयच्या 4% लक्ष्यातच राहिली आहे.

तर दुसरीकडे या वर्षी फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली होती, ज्यामुळे रेपो दर 6 टक्के पर्यंत खाली आला होता. तर मार्केटला यावेळी 25 बेसिस पॉइंट्स कपातीची आपेक्षा आहे.

अनेकांना दिलासा, ‘या’ दिवशी सुरू होणार समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय एमपीसीने एप्रिलच्या धोरणात ‘तटस्थ’ वरून ‘उदारमतवादी’ असा दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कपातीची अपेक्षा वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube