100 अन् 200 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय; बँकांना दिल्या ‘या’ सूचना

RBI on 100-200 Rupee Notes : ज्यावेळी तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा नेहमीच 500 रुपयांच्या नोटा मिळतात. त्यामुळे 500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी अनेक ठिकाणी चकरा माराव्या लागतात. जर प्रत्येक एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्याही नोटा मिळाल्या तर.. पण असं होत नाही. आता आरबीआयने (Reserve Bank of India) हेच शक्य करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. देशातील बँकांनी एटीएममध्ये 100 ते 500 रुपयांच्या नोटांची व्यवस्था करावी अशा सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
देशातील नागरिकांसाठी एटीएमद्वारे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी 100 आणि 200 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात एटीएममध्ये बँकांनी ठेवाव्यात. आरबीआयने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. देशातील बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्सने या सूचना टप्प्याटप्प्यात लागू कराव्यात असे या परिपत्रकात म्हटले आहे. व्हाइट लेबल एटीएम सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमप्रमाणेच काम करतात. या एटीएममधून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढता येतात. बॅलन्स चेक यांसारख्या सुविधा देखील या एटीएमद्वारे मिळतात.
भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?, आरबीआयने खरेदी केले ‘इतके’ टन सोनं
100 आणि 200 रुपयांच्या नोटा लोकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता एटीएममधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटाही मिळतील याची जबाबदारी बँकांना घ्यावी लागणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व एटीएममध्ये 75 टक्के एटीएमपैकी कमीत कमी एक कॅसेटमधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा लोकांना मिळाल्या पाहिजेत. यानंतर पुढील टप्प्यात 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएममधून कमीत कमी एक कॅसेटमधून 100 आणि 200 रुपयांच्या नोटा मिळाल्या पाहिजेत. या पद्धतीने बँकांनी नियोजन करावे अशा सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
1 मेपासून पैस काढणे महागणार
दरम्यान, 1 मेपासून काही नियम बदलणार आहेत. यात एटीएममधून कॅश विड्रॉलच्या (Cash Withdraw) नियमांत बदल झाला आहे. होम बँक नेटवर्कच्या बाहेर जर कोणत्याही एटीएम मशीनमधून कोणताही व्यवहार झाला किंवा बॅलन्स तपासला गेला तर यूजरला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंतच्या व्यवस्थेत एखाद्या ग्राहकाने त्याच्या होम बँक एटीएमऐवजी अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढले तर अशा प्रत्येक व्यवहारावर त्याला 17 रुपये शुल्क द्यावे लागत होते.
आता 1 मेपासून या शुल्कात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स चेक केला तर त्यावर 6 रुपये शु्ल्क द्यावे लागत होते. याही शुल्कात एक रुपयाची वाढ झाली आहे.
कमी व्याजदराने मिळणार कर्ज अन् EMI ही होणार कमी, आरबीआय करणार मोठी घोषणा