भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?, आरबीआयने खरेदी केले ‘इतके’ टन सोनं

भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीमागे कारण काय?, आरबीआयने खरेदी केले ‘इतके’ टन सोनं

Gold Purchase by RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याची जोरदार खरेदी सुरु केली आहे. (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 57.5 टन सोने भारताने घेतलं आहे. यामुळे देशाच्या सुवर्ण भंडारात चांगलीच वाढ झाली आहे. देशाचा सुवर्ण भंडार 879.6 टन झाला आहे. आरबीआयकडून मागील सात वर्षांतील सर्वात मोठी सोने खरेदारी झाली आहे.

सोने नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील सोन्यात गुंतवणूक करत असतात. सर्वसामान्य व्यक्तींबरोबर रिझर्व्ह बँकेकडून आपले सुवर्ण भंडार वाढवले जात आहे. आरबीआयने सोन्याची खरेदी जागतिक अस्थिरता आणि डॉलरची परिस्थिती पाहून केली आहे. जगभरातील केंद्रीय बँका अमेरिकन डॉलरची निर्माण झालेली परिस्थिती आणि पश्चिम अर्थव्यवस्थेवरील दबाबामुळे सोनं घेत आहेत. भारतसुद्धा त्या दिशेनेच पाऊल टाकत आहे. त्यामुळे आपला सुवर्ण भंडार मजबूत आणि संतुलित केला जात आहे.

सोन्याचे दर गगनाला; एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, वाचा आपल्या भागातला बाजारभाव

इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची खरेदी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 35 टन, 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी करण्यात आली. 2024-25 मध्ये सोन्याची पुन्हा जोरदार खरेदी आरबीआयने केली. त्याला कारण डॉलरबाबत निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकन डॉलरमध्ये अनेक चढ-उतार दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळले आहे. आरबीआयने ही रणनीती भारताच्या विदेशी मुद्रा भंडारात विविधता आणण्यासाठी अवलंबली आहे. सन 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत ज्या देशांनी सर्वाधिक सोने घेतले आहे, त्यात भारताचा क्रमांक टॉप पाचमध्ये आहे.

भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक आहे. अडचणीच्या काळात ते कामाला येते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येते. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोका देखील सोने खरेदीमुळे कमी होईल. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube