काय सांगता! आता 10 वर्षांची मुलेही ऑपरेट करणार बँक खाते, पालकांची गरजच नाही; RBI चा निर्णय

काय सांगता! आता 10 वर्षांची मुलेही ऑपरेट करणार बँक खाते, पालकांची गरजच नाही; RBI चा निर्णय

Reserve Bank of India : लक्षात घ्या, जर एखाद्या मुलाचं वय दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असा मुलगा बँकेत खातं उघडू शकतो आणि ऑपरेटही करू शकतो. रिजर्व बँकेने नियमांत (Reserve Bank of India) महत्वाचा बदल केला आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करावी अशा सूचना आरबीआयने देशातील सर्व बँकांना दिल्या आहेत. आतापर्यंत वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचं खातं सुरू करता येत (Bank Accounts) होतं परंतु, मुलाचे पालकच खाते ऑपरेटर करू शकत होते. नव्या नियमात ही अट काढून टाकण्यात आली आहे.

आरबीआयकडून गाइडलाइन्स जारी

दहा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना बँकेत स्वतंत्र रुपाने बचत खाते, एफडी अकाउंट सुरू करण्याची परवानगी रिजर्व बँकेने दिली. बँकेने यासंदर्भात एक सधारीत नियमावली जारी केली आहे. कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलांना त्यांच्या नैसर्गिक आणि कायदेशीर पालकांद्वारे बचत आणि एफडी खाते उघडण्याची आणि ऑपरेट करण्याची परवानगी देता येईल. मुलाच्या आईला पालक म्हणून ठेऊन खाती उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, अशी माहिती आरबीआयने कमर्शिअल आणि सहकारी बँकांना पाठवलेल्या पत्रकात दिली आहे.

खुशखबर! गोल्ड लोन EMI मध्ये फेडता येणार, बॅंकांच्या मनमानीला चपराक बसणार; RBI चा प्लॅन काय?

दहा वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या किमान वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार खातेउ उघडण्याची आणि चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये बँका त्यांच्या जोखीम व्यवस्थापन धोरणाचा विचार करुन रक्कम आणि अटी ठरवू शकतात. याबाबत कोणत्याही अटी आणि शर्ती निश्चित केल्या तर त्याची माहिती खातेधारकाला दिली जाईल.

1 जुलैपासून अंमलबजावणी करा

बँका त्यांच्या जोखीम व्यवस्थापन धोरणे, उत्पादने आणि ग्राहकांच्या आधारावर खातेधारकांना इंटरनेट बँकिंग, एटीएम कार्ड, चेकबूक सुविधा या अतिरिक्त सुविधा देऊ शकतात. अल्पवयीन मुलांची खाती स्वतंत्रपणे चालवली जावीत किंवा पालकांमार्फत चालवली जावीत, ओव्हरड्रॉ होणार नाहीत खात्यात किमान रक्कम शिल्लक राहील याची काळजी बँकांनी घ्यावी. याशिवाय बँका अल्पवयीन मुलांची ठेव खाती उघडण्यासाठी ग्राहकांची तपासणी करतील आणि भविष्यातही ते करत राहतील. येत्या 1 जुलै 2025 पासून सुधारीत मार्गदर्शक तत्वांनुसार नवीन धोरणे तयार करण्यास किंवा विद्यमान धोरणांत सुधारणा करण्याच्या सूचना रिजर्व बँकेने दिल्या आहेत.

UPI मार्फत व्यवहार करणाऱ्यांसाठी RBI ने दिला ‘हा’ मोठा आदेश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube