कमी व्याजदराने मिळणार कर्ज अन् EMI ही होणार कमी, आरबीआय करणार मोठी घोषणा

RBI On Repo Rate : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, आरबीआय या आठवड्यात होणाऱ्या आर्थिक आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपो दरांमध्ये 0.25 टक्क्यांपर्यंत कपात करू शकतो. महागाई कमी झाल्यामुळे आरबीआय व्याजदर कमी करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मे 2020 नंतर पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांच्या अध्यक्षतेखालील आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्के केला होता. तर आता एमपीसीची 54 वी बैठक 7 एप्रिल रोजी सुरू होईल. बैठकीचे निकाल 9 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीत आरबीआय गव्हर्नर व्यतिरिक्त, एमपीसीमध्ये मध्यवर्ती बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि सरकारने नियुक्त केलेले तीन लोक उपस्थित राहणार आहे.
आरबीयाने फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दर (अल्पकालीन कर्ज दर) 6.5 टक्के वर कायम ठेवला होता. आरबीआयने शेवटचा रेपो दर कोविड दरम्यान (मे 2020 ) कमी केला होता आणि त्यानंतर तो हळूहळू 6.5 टक्के करण्यात आला.
या आठवड्यात जाहीर होणारे धोरण अशा वेळी येईल जेव्हा जगभरात आणि अर्थव्यवस्थेत अनेक गोष्टी घडत आहेत. अमेरिकेने लादलेल्या शुल्काचा विकासाच्या शक्यता आणि चलनावर काही परिणाम होईल, ज्याचा विचार एमपीसीला अर्थव्यवस्थेच्या स्थितीच्या सामान्य मूल्यांकनाच्या पलीकडे करावा लागेल. असं बँक ऑफ बडोदा (BOB) चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणाले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात ‘या’ आरोग्य योजनांचा होणार शुभारंभ
ट्रम्पने 60 देशांवर कर लादले
तर दुसरीकडे 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह सुमारे 60 देशांवर 11 ते 49 टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादले, जे 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतासमोर आव्हाने आणि संधी दोन्ही आहेत कारण त्याचे अनेक निर्यातदार स्पर्धक जसे की चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया आणि थायलंड उच्च शुल्कांना तोंड देत आहेत.