जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात ‘या’ आरोग्य योजनांचा होणार शुभारंभ

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात ‘या’ आरोग्य योजनांचा होणार शुभारंभ

World Health Day : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने (World Health Day) सोमवार 7 एप्रिल 2025 महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 सोहळा व विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत या आरोग्य सेवा महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 आणि आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य सेवांचे उद्घाटन होणार आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने “आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य ” हे घोषवाक्य जाहीर केले आहे. या घोषवाक्यानुसार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नवीन आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ करत आहे.

आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा यावेळी महाराष्ट्र आरोग्य सन्मान पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या आरोग्य सेवा योजनांचा होणार शुभारंभ…

e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ

महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act) ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण शुभारंभ

राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ

राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन

गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी !

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा खुली !

महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ

WhatsApp करणार धमाका, ‘हे’ 3 नवीन फीचर्स बदलणार व्हॉइस अन् व्हिडिओ कॉलिंगची मज्जा

महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 पारितोषिक वितरण आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube