‘या’ बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! 25000 रूपयांपर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयची परवानगी

‘या’ बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! 25000 रूपयांपर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयची परवानगी

New India Cooprative bank coustumer allowed for withrwal 25 thousand : न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांना रिझर्व बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतचे रक्कम काढण्याची परवानगी मिळाली आहे. 27 फेब्रुवारी 2025 पासून या बँकेच्या ठेवीदारांना पैसे काढता येणार आहेत.

अमेरिकेनंतर आता भारतीयांना कॅनडातूनही बाहेर पडावे लागणार; स्टडी व वर्क परमीटबाबत घेतला मोठा निर्णय

दरम्यान न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये तब्बल 122 कोटींचा गैरव्यवहार झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यावर मोठी कारवाई केली होती त्यामध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. तसेच जनरल मॅनेजर हितेश मेहतांना अटक देखील करण्यात आली होती.
दुसरीकडे मात्र आरबीआयने या बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणल्याने ठेवीदार आणि ग्राहकांना हा मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी, भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये शानदार एंट्री !

त्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र त्यानंतर आता आरबीआय ने 27 फेब्रुवारी नंतर ठेविदारांना 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे तर दुसरीकडे अटक करण्यात आलेले बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्यासह धर्मेश पान आणि अभिमन्यू भुवन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

निर्बंध लादलेल्या बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

गेल्या काही वर्षांत अनेक बॅंकामध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची मोठी अडचण झाली. अनेकांकडे लाखो रूपये अशा अनेक निर्बंध लादलेल्या बॅंकांमध्ये अडकून पडले आहेत. मात्र त्यांना 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नव्हती. मात्र आता या ग्राहकांना सरकारने एक दिलासा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या