मोठी बातमी, भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये शानदार एंट्री !

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा (NZvsBAN) 6 विकेट्सने पराभव केला आहे. बांगलादेशच्या या पराभवानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.
आज झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) शानदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. त्याने 105 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या. या दरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. तो या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा पहिलाच सामना खेळत आहे. दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता.
INTO THE SEMIS 🤩
A third-successive final-four appearance for India at the #ChampionsTrophy 👏 pic.twitter.com/N8kR0rhRMy
— ICC (@ICC) February 24, 2025
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने कर्णधार नझमुल हसन शांतोच्या 77 धावांच्या आणि झाकेर अलीच्या 45 धावांच्या जोरावर 236 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. शांतो आणि तन्जीद हसन यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली होती मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात कमबॅक केला. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने 4 विकेट्स घेत बांगलादेशला या सामन्यात बॅकफूटवर आणले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक 112 धावा केल्या. रचिन व्यतिरिक्त टॉम लॅथमने 55 धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 129 (135) धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. या विजयासह न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गट अ मधील दुसरा उपांत्य फेरीचा संघ भारत आहे, तर बांगलादेश आणि पाकिस्तानचा प्रवास संपला आहे.
‘ऑपरेशन टायगर’ अन् मविआचे खासदार फुटणार? शरद पवार स्पष्टच बोलले…