‘ऑपरेशन टायगर’ अन् मविआचे खासदार फुटणार? शरद पवार स्पष्टच बोलले…

  • Written By: Published:
‘ऑपरेशन टायगर’ अन् मविआचे खासदार फुटणार? शरद पवार स्पष्टच बोलले…

Sharad Pawar On Operation Tiger :  विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे तर अनेक नेते प्रवेश करण्याची तयारी करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये (BJP) प्रवेश करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सध्या राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) बद्दल चर्चा सुरू आहे.  तर आता ऑपरेशन टायगरवर शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ऑपरेशन टायगरबाबत मला माहिती नाही, पण माझ्याकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सर्व खासदारांची बैठक होती. आम्ही दोन – तीन तास चर्चा केली. त्यात कुणाच्याही मनात फुटण्याचा विचार नाही. उद्धव ठाकरेंचे लोक त्यांच्यासोबत एक विचाराने आहे. असं शरद पवार या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

तसेच त्यांनी यावेळी  ‘हलके में मत लो’ असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की,  ‘हलके में मत लेलो हे काय प्रकरण आहे. मला मराठी जेवढं कळतंय त्यात हा शब्द नाही’ असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लावला.

… तर मी लक्षात ठेवेन

तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संजय राऊतांना देखील टोला लावला आहे. काहीदिवसांपूर्वी महादजी शिंदे पुरस्कार एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यानंतर खासदार राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी विषय काढला त्यात काही चुकीचं नाही. एका संस्थेने एकनाथ शिंदेंचा सत्कार ठेवला होता आणि त्यात मी सहभागी झालो. फारसं चुकीचं नाही.

8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, मस्साजोग येथून होणार सुरु ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

या कार्यक्रमात शिंदेंसह 15 लोकांना पुरस्कार देण्यात आला मात्र 14 लोकांचं नाव कोणी धापलं नाही. हा पुरस्कार राजकीय संघटनेने दिला नाही. पुरस्कार दिल्लीतील मराठी लोकांनी दिला. मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी लक्षात ठेवेन, असे या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube