कुणाचा सत्कार करायचा, त्याची परवानगी घेऊ का ? शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

Sharad Pawar On Sanjay Raut : देशाची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आला होत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली होती.
तर आता शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लावत मी कुणाचा सत्कार करावा यासाठी कोणाची परवानगी घ्यावा लागेल का? आणि परवानगी घ्यावी लागत असेल तर यापुढे लक्षात ठेवेल. असा टोला शरद पवार यांनी पत्रकार परिषदे बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लावला.
या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी विषय काढला त्यात काही चुकीचं नाही. एका संस्थेने एकनाथ शिंदेंचा सत्कार ठेवला होता आणि त्यात मी सहभागी झालो. फारसं चुकीचं नाही. या कार्यक्रमात शिंदेंसह 15 लोकांना पुरस्कार देण्यात आला मात्र 14 लोकांचं नाव कोणी धापलं नाही. हा पुरस्कार राजकीय संघटनेने दिला नाही. पुरस्कार दिल्लीतील मराठी लोकांनी दिला. मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी लक्षात ठेवेन, असे या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले.
पदाच्या बदल्यात मर्सिडीज’ हे विधान मूर्खपणाचे
तर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवर देखील टीका केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, दिल्लीत झालेलं दुसरं मराठी साहित्य संमेलन यशस्वी झालं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी त्यातच उद्घाटन केलं होतं तर स्वागताध्यक्ष गाडगीळ होते. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं, तर स्वागताध्यक्ष मी होतो. तसेच साहित्य संमेलन म्हटलं की वाद असतोच पण निलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारच भाष्य साहित्य संमेलनात करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे राऊत त्यांना बोलले ते योग्यच आहे. असं म्हणत पवारांनी नीलम गोऱ्हेंना फटकारले तर राऊतांना समर्थनही दिलं.
ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिल तो पागल है’ 28 फेब्रुवारीला पुन्हा होणार रिलीज
पुढे ते म्हणाले की, त्यांनी काढलेला गाडीचा विषय देखील योग्य नव्हता. त्यामुळे त्यांचं हे विधान मुर्खपणाचं होतं. त्या वेळा आमदार कशा झाल्या हे राज्याला माहिती आहे. त्या आंबेडकरांच्या पक्षातून राजकारणात आल्या. त्यानंतर त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गटात गेल्यात त्यामुळे त्यांना सर्व पक्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी असं भाष्य करणं योग्य नव्हतं. त्यामुळे राऊत जे म्हणतात ते योग्य आहे.