ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिल तो पागल है’ 28 फेब्रुवारीला पुन्हा होणार रिलीज

Dil To Pagal Hai : यशराज फिल्म्सने या रोमँटिक महिन्याचा शेवट ‘दिल तो पागल है’ ला पुन्हा एकदा रीलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर अभिनीत हा चित्रपट या आठवड्यात पुन्हा रीलीज होत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) , माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ब्लॉकबस्टर सिनेमा 28 फेब्रुवारीला पुन्हा थिएटरमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 1997 मध्ये रीलीज झाला होता आणि त्यावेळी तो ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटातील गाणी आणि स्टोरी अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.
दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या दिग्दर्शनाखाली 1997 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला होता. ‘दिल तो पागल है’ने पुरस्कार सोहळ्यांवरही वर्चस्व गाजवलं. या चित्रपटाने 3 राष्ट्रीय पुरस्कार, 7 फिल्मफेअर पुरस्कार आणि अनेक सन्मान पटकावले. हृदयस्पर्शी संगीत, मनमोहक डान्स सिक्वेन्सेस आणि अमर संवादांसाठी प्रसिद्ध असलेला हा सिनेमा अजूनही बॉलीवूड प्रेमकथांचा एक कल्ट क्लासिक मानला जातो.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल खास माहिती
हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पहिल्यांदा 1997 मध्ये रीलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमारने एक छोटीशी भूमिका साकारली आहे.
मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचले; दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती
या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कारांचा समावेश आहे. हा चित्रपट नर्तकांच्या कथेवर आधारित आहे, जो शाहरुख, माधुरी आणि करिश्माभोवती फिरतो.