मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचले; दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

  • Written By: Published:
मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचले; दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

Manikrao Kokate  : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. मंत्री कोकाटे यांनी शिक्षेसा स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आज सत्र न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा देत दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. जेव्हापर्यंत या प्रकरणात सुनावणी सुरु आहे तेव्हा पर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय नाशिक सत्र न्यायालयाने दिला आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे घरं लाटण्याचा प्रकरणात त्यांना आता तात्पुरता दिलासा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) 20 फेब्रुवारी रोजी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय?

1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या.

त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.

शेअर बाजारात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे बुडाले हजारो कोटी, ‘हे’ आहे कारण 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube