शेअर बाजारात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे बुडाले हजारो कोटी, ‘हे’ आहे कारण

  • Written By: Published:
शेअर बाजारात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे बुडाले हजारो कोटी, ‘हे’ आहे कारण

Indian Stock Market Crash : नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण (Indian Stock Market Cras) पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 700 अंकांपेक्षा जास्त घसरला तर निफ्टीमध्ये देखील 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स तब्बल 854.99 अंकांनी घसरून 774,456.07 वर बंद झाला आणि निफ्टी 243 अंकांच्या घसरणीसह 22,552.50 वर बंद झाले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होणारी विक्री आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणाशी संबंधित अनिश्चितता असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

या घसरणी मागील 4 मुख्य कारणे

कमकुवत जागतिक संकेत

अमेरिकन शेअर बाजारात (American Share Market) होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांची मागणी कमी होताना दिसत आहे. टॅरिफ धोक्यांशी संबंधित चिंतेमुळे अमेरिकन शेअर बाजार मागील व्यवहारात घसरणीसह बंद झाला होता. अमेरिकेत टॅरिफशी संबंधित उपाययोजनांमुळे महागाई वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे अमेरिकेत स्टॅगफ्लेशनचा अंदाज वर्तवला जात आहे.

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाशी संबंधित अनिश्चितता

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लावण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, भारत अनेक वस्तूंवर 200 टक्क्यांपर्यंत कर आकारतो तर अमेरिका भारतीय वस्तूंवर खूप कमी कर आकारतो त्यामुळे जितका कर भारत आकारतो तितका कर अमेरिका आकारणार असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहे आणि याचा देखील परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्री

भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदार गेल्या काही दिवसांपासून सतत पैसे काढत असल्याने शेअर बाजारात दबाव वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणुकदारांनी 36,973.70 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी 3,449 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची अपेक्षा  

सध्या अमेरिकेत दीर्घकालीन महागाई दर वाढण्याची अपेक्षा असल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून अपेक्षित दर कपात प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी आहे आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी फेडरल रिझर्व्ह आक्रमक भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे.

‘आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात’, माणिकराव कोकाटेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

या निर्णयाचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारांवर होऊ शकतो. जर असे झाले आणि अमेरिकन बाँडचे उत्पन्न कमी होऊ लागले, तर एफआयआय भारतात विक्री थांबवू शकतात आणि पुन्हा खरेदी सुरू करू शकतात. परंतु सध्या अल्पकालीन दृष्टिकोन अत्यंत अनिश्चित दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube