डोनाल्ड ट्रम्पच अधारकार्ड बनवून दाखवण पडलं महागात; रोहित पवारांवर गुन्हा दाखल

Rohit Pawar यांना मतचोरीचे आरोप करताना फेक आधार कार्ड बनवून दाखवणं महागात पडलं आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Rohit Pawar

Case Filed Aaginst Rohit Pawar due to fake Aadhar card of Donald Trump : मतचोरी आणि मतदार याद्यांचा घोळ यासाठी महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबरला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्यासोबत तासभर मंत्रालयात बैठक घेतली होती. त्यांनंतर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट राहुल गांधींप्रमाणे कागदपत्रं घेऊन येत फेक आधार कार्ड कसे बनविले जाते? फेक वेबसाईटचा वापर कसा होत आहे. हे दाखवलं होतं. मात्र हे प्रात्याक्षिक करून दाखवणं रोहित पवार यांना महागात पडलं आहे. कारण या प्रकरणी आता रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरणं काय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये विरोधकांकडून सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगार मतचोरी, बनावट मतदार असे विविध आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्यातील मतदार याद्यांतील घोळ समोर आणला होता. ज्यामध्ये थेट अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव होतं. या धक्कादायक प्रकरानंतर त्यांनी हे नावं मतादार याद्यांमध्ये बनावट आधार कार्ड बनवून कसे येतात? बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा डेमो दाखवला होता. मात्र या प्रकरणी त्यांच्यावर भाजपच्या आटीसेलच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1983124438989320275?

काय म्हणाले रोहित पवार?

आदरणीय फडणवीस साहेब, बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं…. आता यावर हसावं की रडावं हेच कळेना… जर मीच स्वतः डेमो देऊन आधारकार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर आधारकार्ड खरं की बनावट याची 15 दिवस चौकशी करण्याची मुळातच गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे कसा आहे?

मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या; राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाला विनंती

असेलच तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण यासह अशा कितीतरी घटना आहेत ज्यामधील SIT चौकशी किंवा पोलीस तपास पुढे सरकत नाही. अशा प्रकरणात गृह विभागाने चौकशी करण्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपण अभ्यासू नेते आहात आणि त्याचा कायमच आदर आहे, पण आज आपल्या सल्लागारांना समज देण्याची आणि गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून कामावर लक्ष देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे. आपण त्या द्याव्यात, ही विनंती!

follow us