‘आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात’, माणिकराव कोकाटेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

  • Written By: Published:
‘आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात’, माणिकराव कोकाटेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

Manikrao Kokate On Devendra Fadnavis :  राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) आम्हाला दम दिला. माझ्यासह तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत झालं पाहिजे. 100 दिवासांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा म्हणजे सरकार आणि आपली सांगड बसली पाहिजे त्यामुळे समाजात एक प्रकारचं स्थैय निर्माण होईल. असं या कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.

या कार्यक्रमात पुढे बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, खतं आणि औषधाच्या लिंकिगमुळे शेतकरी हैराण झालं आहे. रासायनिक शेतीकडे जाण्याच काही अर्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. मार्केट कमिट्यांमध्ये बोर्ड लावा. बाजार भाव सांगा, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपुर्वी न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

Video : मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या मारणे टोळीविरोधात मकोका – पोलीस आयुक्त

माध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, माझं एकदा झालं की तुम्हाला प्रतिक्रिया देतो. जे काही कायदेशीर आहे, ते बघू. मी पात्र आहे की अपात्र आहे, ते बघू. असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube