मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पोक्सो प्रकरणात 4 वर्षानंतर आरोपीला जामीन

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पोक्सो प्रकरणात 4 वर्षानंतर आरोपीला जामीन

Mumbai High Court :  स्वेच्छेने मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Case) दाखल गुन्ह्यातील 21 वर्षीय आरोपी तरुणाला चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. तक्रारदार मुलीने 25 जुलै 202 रोजी कोणालाही न कळवता घर सोडले होते. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत 25  हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला जामीन देण्यात आला.

न्यायालयाने नोंदवले की, मुलीला तिच्या कृत्याची पूर्ण जाणीव होती आणि ती स्वेच्छेने, कोणत्याही दबावाशिवाय, आरोपीसोबत गेली. 2019 पासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, याची तिच्या कुटुंबीयांना माहिती होती. मुलगी 25 जुलै 2020 रोजी घरातून पळून गेली आणि दिल्लीमार्गे आरोपीच्या उत्तर प्रदेशातील घरी 10 महिने स्वेच्छेने राहिली. 4 ऑगस्ट 2020 रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदला गेला, तर 8 मे 2021 रोजी मुलीने वडिलांना फोन करून गरोदर असल्याचे आणि आरोपी लग्नास नकार देत असल्याचे सांगितले.

ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आरोपीचे वकील ॲड. मतीन कुरैशी यांनी युक्तिवादात सांगितले की, मुलीने स्वेच्छेने घर सोडले आणि तिला सर्व बाबींची जाणीव होती. तक्रारदारातर्फे ॲड. आफ्रिन शेख आणि ॲड. शेहजाद शेख, तर राज्यातर्फे ॲड. राजश्री न्युटन यांनी बाजू मांडली. जामीन देताना आरोपीने न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, अशी अट घालण्यात आली. या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, यापुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष आहे.

मोठी बातमी, हेमलता पाटलांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र

follow us
  • fb
  • instagram
  • youtube