मोठी बातमी, हेमलता पाटलांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र

Hemlata Patil : राज्यातील राजकारणाची एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, दिड महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) तिकीट नाकारल्यानंतर हेमलता पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
— Dr.Hemlata Patil (@DRHEMLATA3) April 15, 2025
विधानसभा 2024 च्या निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता पक्षांतर्गत गटबाजीमुळे हेमलता पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून देखील राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याची देखील माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
सोनम कपूरने डियोर ऑटम शो 2025 मध्ये लावले सौंदर्याचे शोभिवंत दर्शन
याबाबतची माहिती देताना हेमलता पाटील म्हणाल्या की, गेल्या 35 वर्ष मी काँग्रेस पक्षात कार्यरत होतो मात्र विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून देखील तिकीट न मिळाल्याने मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता परंतु या पक्षात काम करताना मी या पक्षाला योग्य न्याय देऊ शकत नसल्याने यानंतर या पक्षात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं हेमलता पाटील म्हणाल्या.
शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी