सोनम कपूरने डियोर ऑटम शो 2025 मध्ये लावले सौंदर्याचे शोभिवंत दर्शन

Sonam Kapoor : बॉलिवूडची आयकॉन आणि आंतरराष्ट्रीय फॅशन म्युझ सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने डियोर ऑटम शो 2025 (Dior Autumn Show 2025) मध्ये आपल्या अप्रतिम उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जपानच्या सांस्कृतिक राजधानीत, क्योटो (Kyoto) येथे पार पडलेल्या या शोमध्ये सोनमने डियोर प्री-फॉल 2025 कलेक्शनमधील देखण्या पोशाखात सहभाग घेतला. ती या शोमध्ये उपस्थित राहणारी एकमेव बॉलिवूड स्टार ठरली. डियोरची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून सोनमने पुन्हा एकदा आपली खास स्टाईल आणि शालीनतेची छाप सोडली. हे फॅशन शो क्योटोमधील प्रसिद्ध टो-जी मंदिरात आयोजित करण्यात आले होते. येथे तिने इतर प्रतिष्ठित पाहुण्यांसह सहभाग घेतला.
सोनमचा हा ग्लॅमरस लुक तिची बहीण रिया कपूरने स्टाईल केला होता. सोनमने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, चाहत्यांसह फॅशन तज्ञांकडूनही कौतुक मिळाले आहे. डियोर शोमध्ये सहभाग घेतल्यावर सोनमने सांगितले, “जपान नेहमीच माझ्या हृदयात खास स्थान राखतो. लग्नानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने क्योटोला अनेकदा भेट दिली आहे आणि इथल्या लोकांचं प्रेम आणि आपुलकी आम्हाला अनुभवायला मिळाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी
यंदा डियोर अॅम्बेसडर म्हणून इथे परत येणं हे माझ्यासाठी अधिकच खास आहे.” “डियोर त्यांचे शो अत्यंत भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी कोणतीही कसूर ठेवत नाही, हे सर्वांना माहीत आहे. या शोमध्ये स्टाईल आणि सांस्कृतिक पारंपरिकतेचं सुंदर मिश्रण पाहायला मिळते.
View this post on Instagram
डियोर प्री-फॉल 2025 शो याला अपवाद नाही. मारिया ग्राझिया चिउरी यांनी सादर केलेला हा कलेक्शन जपानची समृद्ध परंपरा आणि डियोरची कालातीत स्टाईल यांचा एक अप्रतिम संगम आहे.”