ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Sanjay Ghatge : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश होत असल्याने भाजपा सदस्य संख्या आणखी 50 लाखांनी वाढेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे आज ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी ठाकरे गटाचे  कागलचे माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

संजय घाटगे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) आणि मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद बळीराम हिरे, श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.

तर यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, कागल व शहापूरच्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असून त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे बावनकुळे म्हणाले. शहराच्या विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे हिरे म्हणाले. भाजपाचे निष्ठेने काम करून भाजपाचा झेंडा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दिमाखात फडकवू असेही त्यांनी नमूद केले.

मोठी बातमी, हेमलता पाटलांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी  यांच्यासह 12 माजी नगरसेवक, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषद माजी सभापती निखिल बरोरा, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, तुषार गांधी, प्रसाद हिरे यांच्या पत्नी गीतांजली हिरे, नाशिक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाजीराव निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, अशफाक शेख, सुधाकर बाचकर यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांत  समावेश आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube