पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संघ स्मृती मंदिरातील संदेश; म्हणाले, हे स्थळ आम्हाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देतं

PM Narendra Modi Abhiwadan To Hedgewar : नागपुरातील नेत्र संस्थान आणि अनुसंसाधन केंद्राच्या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा शिलान्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी आले (Hedgewar ) असता मोदींनी संघाचे पहिले संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या नोंदवहीत संदेश लिहिला आहे. हे स्थळ आम्हाला राष्ट्रसेवेसाठी कायम प्रेरणा देतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी थेट संघाच्या संघ स्मृती मंदिरात गेले. याठिकाणी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केलं. पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर आले आहेत.
नागपुरमध्ये हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर जात पंतप्रधान मोदींनी केलं अभिवादन, सरसंघचालकही उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी थेट संघाच्या संघ स्मृती मंदिरात गेले. याठिकाणी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केलं. पंतप्रधान म्हणून मोदी दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर आले आहेत. सलग दोन वेळा दीक्षाभूमीवर येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत.
10 मिनिटे चर्चा
मोदी संघ कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. मोदी तब्बल 10 मिनिटे संघ कार्यालयात होते. त्यानंतर त्यांचा ताफा दीक्षाभूमीच्या दिशेने निघाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नागपूरकरांना अभिवादन करतच मोदींचा ताफा निघाला होता.