“त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणून…” : निखिल वागळे यांना प्रत्युत्तर देत पुणे पोलिसांचे पाच गंभीर प्रतिआरोप

“त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणून…” : निखिल वागळे यांना प्रत्युत्तर देत पुणे पोलिसांचे पाच गंभीर प्रतिआरोप

पुणे : आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका, असे निखिल वागळे यांना सांगितले होते. पण त्यानंतरही ते आमच्या सल्ल्याविरुद्ध घटनास्थळी रवाना झाले आणि पोलिसांना चुकवून प्रत्यक्षात मार्ग बदलला, असे म्हणत पुणे पोलिसांनी (Pune Police) ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे खापर त्यांच्यावरच फोडले. तसेच पुणे पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर पोलिसांनी वागळे यांच्यावरही प्रतिआरोप केले. (Five counter-allegations of Pune Police in response to Nikhil Wagle)

काल (9 फेब्रुवारी) निखील वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत या सभेला जातानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलाजवळ वागळे यांच्या गाडीला लक्ष्य केले.

भाजपचे कार्यकर्ते वागळेंसह पुरोगाम्यांवर तुटून पडलेले त्यावेळी भक्ती कुंभार थेट भिडल्या…

कार्यकर्त्यांनी दगड फेक करत हॅाकी स्टिक्स, रॉड्सने गाडी फोडली,  काचा फोडल्या. या तिघांच्याही अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांनी वागळे, चौधरी आणि सरोदे यांच्या गाडी गाडीला कडे करुन संरक्षण दिले अन् ही मंडळी निर्भय बनोच्या सभास्थळी पोहचले. त्यानंतर प्रचंड गर्दीत सभा पार पडली.

यावेळी बोलताना निखिल वागळे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. आज माझ्यावर झालेल्या हल्ल्याला केवळ पुणे पोलीस जबाबदार आहेत. त्यांना हल्ला होणार हे माहिती होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सिनेमातील पोलिसांसारखी केवळ बघ्याची भूमिका घेतली. महाराष्ट्राचे पोलीस दल भाजपने विकत घेतले आहे, जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काहीही नैतिकता राहत नाही, असे आरोप वागळे यांनी केला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले पुणे पोलीस?

1. निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने पुण्यातील वातावरण तापले होते.

2. वागळे पुण्यात पोहोचल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अतिप्रचंड तणावपूर्ण वातावरणाची माहिती दिली. कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने आंदोलक होते. त्यामुळे आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका, असे त्यांना सांगितले होते.

3. आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी जावे, असेही वागळे यांना सांगण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे 25 आंदोलकांच्या गटाला  ताब्यात घेण्यात आले होते. आणखी काहींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

निखील वागळेंसह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल, हल्ला करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा

4. जोपर्यंत आम्ही परिसर सुरक्षित करत नाही तोपर्यंत काही काळ थांबण्यासाठी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी तेथून जाण्याचा आग्रह धरला. रस्त्यांवरील अवजड वाहतुकीमुळे अटकेची प्रक्रिया मंदावली असून बळाचा वापर करणे कठीण होत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली.

5. आमच्या सल्ल्याविरुद्ध ते घटनास्थळी रवाना झाले आणि पोलिसांना चुकवून प्रत्यक्षात मार्ग बदलला. तरीही आमचे साध्या वेशातील अधिकारी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या गाडीच्या मागे होते.

6. कारवर हल्ला झाला तेव्हा आंदोलक आणि त्यांची गाडी यांच्यामध्ये साध्या वेशातील पोलीस होते पण प्रचंड रहदारी आणि जवळ उभे राहणाऱ्यांमुळे त्यांना आणि त्यांच्या गाडीला तात्काळ बाहेर काढणे शक्य नव्हते.

७. दंगल, मालमत्तेचे नुकसान इत्यादी कलमांतर्गत घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची प्रक्रिया सुरू झाली असून पुणे शहर पोलिसांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज