मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; मोदी-फडणवीसांसाठी राणेंनी तलवार उपसली
Narayan Rane On Udhav Thackeray : लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासोबत भाजप, आरएसएस आणि आम्ही आहोत, मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, या शब्दांत खासदार नारायण राणे (Narayan Rane) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तलवार उपसलीयं. दरम्यान, राजकारणात एकतर फडणवीस किंवा मी राहणार असल्याचा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. या इशाऱ्यानंतर नारायण राणे मैदानात उतरले आहेत. यासंदर्भात राणे यांनी एक परिपत्रक एक्सवर पोस्ट केलंय.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 2, 2024
राणे पिता-पुत्रांकडून थेट उद्धव ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबियांवर जोरदार प्रहार केला जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना इशारा दिल्यानंतर नारायण राणे मागे राहिले नाहीत. राणे यांनीही परिपत्रक काढून जोरदार टीका केलीयं. ते म्हणाले, ठाकरेंची पंतप्रधान मोदींना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणूकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो. नरेंद्र मोदींबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात, असंही नारायण राणए म्हणाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पहिलाच आठवडा वादाचा; रॅपरनेच घेतला खलनायिकेसोबत पंगा
तसेच आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःताचे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भाजप व आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
OBC आरक्षणातून अधिकारी झालेले पूजा खेडकरमुळे अडचणीत; कोर्टाचे महत्वपूर्ण आदेश
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उघड आव्हान दिले. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार, असा थेट इशारा देत आता ‘आर किंवा पार’ची राजकीय लढाई सुरु केली. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.