OBC आरक्षणातून अधिकारी झालेले पूजा खेडकरमुळे अडचणीत; कोर्टाचे महत्वपूर्ण आदेश
Pooja Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्लीतील (Pooja Khedkar) पटियाला हाऊस कोर्टाने जोरदार झटका दिला. आज न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयाने पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. न्यायालयाने जामीन अर्ज तर फेटाळलाच शिवाय तपास यंत्रणांनी तपास आणखी वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अन्य उमेदवारांनीही अशाच पद्धतीने दिव्यांगत्व आणि ओबीसी श्रेणी अंतर्गत फायदा मिळवला आहे का याचीही चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पूजा खेडकरला कुणी अधिकाऱ्यांनी मदत केली का याचाही तपास करा. पूजा खेडकर यांच्यासह 2022 ला युपीएससी यादीत आलेल्या सर्व ओबीसीच्या उमेदवारांची माहिती घ्या आणि नॉन क्रिमिलेअर तपासा. 2022 च्या यादीतील दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची योग्य तपासणी करा, असेही आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
मला एकटीला खोलीत बोलवत होते.. पूजा खेडकरांचा आरोप, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं सडेतोड उत्तर
दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. काल गुरुवारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज दुपारी न्यायालय निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
पूजाने अटकपूर्व जामीन मिळण्याची मागणी केली होती. जामीन अर्जात माझं वय लहान असून पोलीस तपासाला प्रभावित करण्याची क्षमता माझ्यात नाही. मी कोणतीच फसवणूक केलेली नाही. माझ्याकडे असलेली सर्व खरी कागदपत्रेच युपीएससीला सादर केली होती असे म्हटले होते. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांकडे आहेत. त्यामुळे आता जप्त करण्यासारखे काही नाही. त्यामुळे जामीन देण्यास हरकत नाही अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र अर्ज फेटाळून लावला.
मोठी बातमी! पूजा खेडकरला धक्का, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने ही मागणी मान्य केली नव्हती. त्यानंतर अखेर बुधवारी सुनावणी झाली. पूजा खेडकर यांच्यावतीने अॅड. बीना माधव यांनी बाजू मांडली. पूजा खेडकर यांच्या वकिलांनी सांगितलं की पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग आहेत. त्यांना जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय असू शकतो, असा दावा करण्यात आला होता.